का करायचाय सलमानला मराठी चित्रपटात अभिनय?

अभिनेता सलमान खानने मराठी चित्रपटातही काम करणार असल्याचं म्हटलं आहे. 'सांगतो ऐका' मराठी चित्रपटाचं म्युझिक लॉन्च करण्यासाठी सलमान खान आला होता, तेव्हा सलमानने मराठी चित्रपटांविषयी आपलं मत मांडलं आहे. 

Updated: Sep 18, 2014, 12:29 PM IST
का करायचाय सलमानला मराठी चित्रपटात अभिनय? title=

मुंबई : अभिनेता सलमान खानने मराठी चित्रपटातही काम करणार असल्याचं म्हटलं आहे. 'सांगतो ऐका' मराठी चित्रपटाचं म्युझिक लॉन्च करण्यासाठी सलमान खान आला होता, तेव्हा सलमानने मराठी चित्रपटांविषयी आपलं मत मांडलं आहे. 

यावेळी सलमान खान म्हणाला, मला मराठी चित्रपटांचं आकर्षण आहे, पण कुठेतरी या चित्रपटांकडे दुर्लक्ष होतं, हे चित्रपट एका वेगळ्या स्तरापर्यंत जाऊ शकतात. जर एखाद्या मराठी चित्रपटात मला भूमिका मिळाली तर मी जरूर करेन.

मराठी चित्रपटाचं रिमेक
सलमान खानला प्रादेशिक चित्रपटांच्या उद्योगात झालेल्या वाढीविषय़ी पूर्ण कल्पना आहे, कारण सलमान म्हणतो, पंजाबी चित्रपटांचा बिझनेस वेगाने वाढतोय, मात्र एखाद्या मराठी चित्रपटाचा रिमेक करणार का? हा प्रश्न सलमान खानने हसता-हसता टाळला, सलमान खान विधी कासलीवाल यांच्या सांगतो ऐका चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चसाठी आला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.