तात्याने आर्ची आणि परशाला का मारलं?

सैराट चित्रपटाचा शेवट अनेक प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला आहे, तात्याने असं का केलं?, असा प्रश्न पडतो. दुर्देवाने राजकारणात नेत्याची प्रतिष्ठा त्याच्या घरातील खासगी बाबींवरून मोजली जाते, आणि आर्ची परशासोबत निघून गेल्यानंतर तात्याचं राजकीय करिअरचं शून्य झालं.

Updated: May 14, 2016, 10:48 AM IST
तात्याने आर्ची आणि परशाला का मारलं? title=

मुंबई : सैराट चित्रपटाचा शेवट अनेक प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून गेला आहे, तात्याने असं का केलं?, असा प्रश्न पडतो. दुर्देवाने राजकारणात नेत्याची प्रतिष्ठा त्याच्या घरातील खासगी बाबींवरून मोजली जाते, आणि आर्ची परशासोबत निघून गेल्यानंतर तात्याचं राजकीय करिअरचं शून्य झालं.

'कुणाच्या बु़डाखाली किती अंधार आहे, हे समदं तालुक्याला माहित आहे. अहो तालुका संभाळायचं राहू द्या, आपल्या बायका आधी सांभाळा म्हणावं यांना', हे तात्याचं बोलणं तात्यावरचं उलटलं होतं.

राजकीय व्यासपीठ गाजवणाऱ्या तात्याला आता कोपऱ्यात जागा मिळू लागली होती, तात्याला आमदार व्हायचं होतं, पण, तात्याची मुलगी आर्ची-परशासोबत निघून गेल्याने, तात्याच्या राजकीय महत्वाकांक्षेला सुरूंग लागला होता. तात्याची आमदारकी दुसऱ्याच्या गळाला लागली होती.

तात्या राजकारणाबाबत अतिमहत्वाकांक्षी असल्याने, आर्ची-परशाला मारून आपली राजकीय, सामाजिक प्रतिष्ठा परत येईल, असा तात्याचा खोटा समज होता, म्हणून तात्याने आर्ची आणि परशाला संपवलं. तात्यावर अप्रत्यक्ष आलेल्या सामाजिक दबावामुळेच तात्याने आपल्या पोटच्या मुलीसह परशाला संपवलं.