UPDATE - पश्चिम महाराष्ट्र : निकाल

विधानसभा निवडणूक २०१४ चे निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अर्थातच या निकालांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे तो महाराष्ट्राचा पश्चिम भाग...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 19, 2014, 10:09 PM IST
UPDATE - पश्चिम महाराष्ट्र : निकाल title=

LIVE UPDATE : सकाळी 4.00
- बारामती मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय... तब्बल 89700 मतांच्या फरकानं खेचून आणला विजय 
- पाटण मतदारसंघाचा निकाल : शिवसेनेचे शंभुराज देसाई यांचा 18754 मतांनी विजय

LIVE UPDATE : सकाळी 3.20
- पिंपरी मतदारसंघाचा निकाल : शिवसेनेचे आयात उमेदवार गौतम चाबुकस्वार यांचा विजय 
- कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा निकाल : भाजपचे अमल महाडिक विजयी, काँग्रेसचे सतेज (बंटी) पाटील यांना पछाडलं
- कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा निकाल : शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयी 
- चंदडग मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर विजयी
- शिरोळा मतदारसंघाचा निकाल : सेनेचे उल्हास पाटील विजयी 
- हातकणंगले मतदारसंघाचा निकाल : सेनेचे सुजित मिंचेकर विजयी
- पर्वती मतदारसंघाचा निकाल : भाजपच्या माधुरी मिसाळ यांचा 69000 मतांनी विजयी,   यांना पछाडलं.
- कोथरुड मतदारसंघाचा निकाल : मेधा कुलकर्णी 64642 मतांनी विजयी 
- खडकवासला मतदारसंघाचा निकाल : भाजपचे भीमराव तपकीर यांचा विजय
- पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा निकाल : दिलीप कांबळे विजयी, माजी मंत्री रमेश बागवेंचा पराभव  
- शिवाजीनगर मतदारसंघाचा निकाल : भाजप विजय काळे ठरले जायंट किलर... काँग्रेसच्या विनायक निम्हण यांचा पराभव...

LIVE UPDATE : सकाळी 3.15
- कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा निकाल : भाजपचे अमल महाडिक विजयी, काँग्रेसचे सतेज (बंटी) पाटील यांना पछाडलं
- कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा निकाल : शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयी 
- चंदडग मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर विजयी
- शिरोळ मतदारसंघाचा निकाल : सेनेचे उल्हास पाटील विजयी 
- हातकणंगले मतदारसंघाचा निकाल : सेनेचे सुजित मिंचेकर विजयी

LIVE UPDATE : सकाळी 2.45
- इंदापूर मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीचे दत्ता भरणे ठरले जायंट किलर... काँग्रेसचे माजी हर्षवर्धन पाटील यांचा दारुण पराभव
- सांगली मतदारसंघाचा निकाल : भाजपचे सुधीर गाडगीळ विजयी 
- शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचा निकाल : भाजपच्या मोनिका राजळे यांचा 53242 मतांनी विजय, राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर घुले यांचा पराभव
- फलटण मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाण यांचा 33568 मतांनी विजयी 
- करवीर मतदारसंघाचा निकाल : सेनेच्या चंद्रदीप नरके यांचा 710 मतांनी विजय 
- कराड उत्तर मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटील यांचा 20280 मतांनी विजयी 
- शाहुवाडी मतदारसंघाचा निकाल : सेनेच्या सत्यजित पाटील यांचा 388 मतांनी विजयी 
- माण मतदारसंघाचा निकाल : काँग्रेसच्या जयकुमार गोरे यांचा 22962 मतांनी विजय 

LIVE UPDATE : सकाळी 2.30
- वाई मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीच्या मकरंद जाधव यांचा 31560 मतांनी विजय 
- सातारा मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीच्या शिवेंद्रसिंग भोसले यांचा 47813 मतांनी विजय 
- कर्जत जामखेड मतदारसंघाचा निकाल : भाजपचे राम शिंदे यांचा विजय 
- तासगाव मतदारसंघाचा निकाल : माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा 22310 मतांनी विजय, भाजपचे अजितराव घोरपडे पराभूत
- शाहुवाडी मतदारसंघाचा निकाल : शिवसेनेचे सत्यजीत पाटील यांचा केवळ 388 मतांनी विजयी 
- राधानगरी मतदारसंघाचा निकाल : शिवसेनेचे  प्रकाश आंबिटकर 39408 मतांनी विजयी, राष्ट्रवादीच्या के. पी. पाटील यांचा पराभव  
- कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा निकाल : भाजपचे अमल महाडिक यांचा 9800 मतांनी विजयी, काँग्रेसच्या सतेज पाटलांचा केला पराभव

LIVE UPDATE : सकाळी 2.00 
- मिरज मतदारसंघाचा निकाल : भाजपचे सुरेश खाडे विजयी
- कोरेगाव मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे 47247 मतांनी विजयी 
- खानापूर मतदारसंघाचा निकाल : शिवसेनेचे अनिल बाबर 10739 मतांनी विजयी, काँग्रेसच्या सदाशिव पाटलांना पछाडलं... यानिमित्तानं शिवसेनेनं जिल्ह्यात खातं उघडलंय.
- नेवासे मतदारसंघाचा निकाल : काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या बाळासाहेब मुरकुटे यांचा 5000 मतांनी विजय, राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकरराव गडाख पराभूत 
- कोपरगाव मतदारसंघाचा निकाल : भाजपच्या स्नेहलता कोल्हे 29345 मतांनी विजयी, सेनेच्या आशुतोष काळे यांचा परभव 
- राहुरी मतदारसंघाचा निकाल : भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांचा 26000 मतांनी विजयी, सेनेच्या उषा तनपुरेंना पछाडलं
- शिराळा मतदारसंघाचा निकाल : भाजपचे शिवाजीराव नाईक 4111 मतांनी विजयी, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक पराभूत 
- पलुस कडेगाव मतदारसंघाचा निकाल : माजी मंत्री पतंगराव कदम विजयी 

- उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व म्हणजे सहा विधानसभा मतदार संघांचे निकाल हाती... या विभागात काँग्रेसनं आपल्या पूर्वीच्या तीन जागा कायम ठेवल्यात तर राष्ट्रवादीच्या दोन जागांवरही विद्यमान आमदार

LIVE UPDATE : सकाळी 1.30
- अहमदनगर शहर मतदारसंघाचा निकाल : नगर शहरातून राष्ट्रवादीचे महापौर संग्राम जगताप 3257 मतांनी विजयी, पाच वेळा सेनेचे आमदार राहिलेल्या सेना उपनेते अनिल राठोड यांना दिली मात 
- करमाळा मतदारसंघाचा निकाल : शिवसेनेचे उमेदवार नारायण पाटील अवघ्या 21 मतांनी विजयी  
- दौंड मतदारसंघाचा निकाल : रासप उमेदवार राहुल कुल 12000 मतांनी विजयी, राष्ट्रवादीच्या रमेश थोरातांवर मात
- भोसरी मतदारसंघाचा निकाल : अपक्ष उमेदवार महेश लांडगे 15080 मतांनी विजयी 
- पुरंदर मतदारसंघाचा निकाल : शिवसेनेचे विजय शिवतारे 8480 मतांनी विजयी, काँग्रेसच्या संजय जगतापांना पछाडलं.
- भोर मतदारसंघाचा निकाल : विद्यमान आमदार संग्राम थोपटे 18617 मतांनी विजयी
- अकोला मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीचे वैभव पिचड यांचा 20363 मतांनी विजय, सेनेच्या मधुकर तळपाडेंचा केला पराभव... काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे हे चिरंजीव

बारामतीमध्ये भाजपच्या तक्रारीनंतर मतमोजणी थांबवली.... 27 मतदान यंत्रांची नोंदच नाही... भाजपनं केली निवडणूक आयोगाकडे तक्रार... प्रथमदर्शनी तक्रारीत तथ्य असल्याची निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती... ईव्हीएम मशीनचे क्रमांक जुळत नसल्याची भाजपची तक्रार

LIVE UPDATE : सकाळी 1.15
- सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचा निकाल : सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांचा 8050 मतांनी विजय 
- दक्षिण कराड मतदारसंघाचा निकाल : राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 16407 मतांनी विजयी, उंडाळकरांना दिली मात 

LIVE UPDATE : सकाळी 1.00
- श्रीरामपूर मतदारसंघाचा निकाल : काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांचा 11382 मतांनी विजय, भाजपच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना पछाडलं.
- सोलापूर मतदारसंघाचा निकाल : भाजपचे विजयकुमार देशमुख यांचा 42000 मतांनी विजय
- श्रीगोंदा मतदारसंघाचा निकाल : भाजपचे बबनराव पाचपुते पराभूत, राष्ट्रवादीचे राहुल जगताप विजयी 
- संगमनेर मतदारसंघाचा निकाल : काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा 55823 मतांनी विजय, सेनेच्या जनार्दन आहेर यांना पछाडलं
- हडपसर मतदारसंघाचा निकाल : भाजपचे योगेश टिळेकर यांचा 30000 मतांनी विजय, सेनेच्या महादेव बाबर यांना पछाडलं.
- वडगाव शेरी मतदारसंघाचा निकाल : भाजपचे जगदीश मुळीक 4000 मतांनी विजयी, सेनेच्या सुनिल टिंगरे यांना पछाडलं... अखेरच्या काही फेऱ्यांत मुळीक यांनी मारली मुसंडी

- भोर मतदारसंघात अठराव्या फेरीअखेरीस काँग्रसचे संग्राम थोपटे 19000 मतांनी आघाडीवर 
- पुण्यात भाजपचा 'डंके की चोट पे' विजय... ८ पैंकी ८ जागा भाजपकडे जाण्याची शक्यता

LIVE UPDATE : सकाळी 12.45
- कागल मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीचे हसन मुश्रिफ विजयी
- पिंपरी चिंचवड मतदारसंघाचा निकाल : भाजपचे लक्ष्मणराव जगताप विजयी

- राज्यात सर्वाधिक मतांनी आघाडीवर असलेले उमेदवार : राष्ट्रवादीचे अजित पवार... बारामती मतदारसंघात ८० हजार मतांची आघाडी
- पाथर्डी मतदारसंघात चौदाव्या फेरीअखेरीस भाजपच्या मोनिकाताई राजळे 4817 मतांनी आघाडीवर 
- कर्जत जामखेड मतदारसंघात सोळाव्या फेरीअखेरीस भाजपचे राम शिंदे 25000 मतांनी आघाडीवर
- वडगाव शेरी मतदारसंघात भाजपचे जगदीश मुळीक यांनी घेतली आघाडी, बापू पाठारे पिछाडीवर
- नेवासा मतदारसंघात सोळाव्या फेरीअखेरीस भाजपचे बाळासाहेब मुरकुटे आघाडीवर 

LIVE UPDATE : सकाळी 12.30
- इचलकरंजी मतदारसंघाचा निकाल : भाजपचे सुरेश हळवणकर 15000 मतांनी
- पिंपरी मतदारसंघाचा निकाल : शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांचा विजयी 
- खेड आळंदी मतदारसंघाचा निकाल : शिवसेनेचे सुरेश गोरे 3253 मतांनी विजयी 

- माण मतदारसंघात भाजपचे जयकुमार गोरे 21696 मतांनी आघाडीवर

LIVE UPDATE : सकाळी 12.00 
- मावळ मतदारसंघाचा निकाल : भाजपच्या संजय (बाळा) भेगडे यांचा 28001 मतांनी विजयी, राष्ट्रवादीच्या माऊली दाभाडेंना दिली मात 
- शिरुर मतदारसंघाचा निकाल : भाजपचे बाबुराव पाचार्णे 15000 मतांनी विजयी, राष्ट्रवादीच्या अशोक पवार यांचा केला पराभव
- आंबेगाव मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील 58205 मतांनी विजयी... वळसे पाटील यांनी सलग सहाव्यांदा मिळवला विजय 

- उमरेड मतदारसंघात भाजपचे सुधीर पारवे 34525 मतांनी आघाडीवर 
- भोसरी मतदारसंघात अपक्ष महेश लांडगे 1378 मतांनी आघाडीवर, सेनेच्या सुलभा उबाळे, भाजपचे एकनाथ पवार यांना टाकलं मागे

LIVE UPDATE : सकाळी 11.45
- जत मतदारसंघाचा निकाल : भाजपचे विलासराव जगताप 15000 मतांनी विजयी, काँग्रेसच्या विक्रम सावंत यांचा केला पराभव, आमदार प्रकाश शेंडगे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले
- इस्लामपूर मतदारसंघाचा निकाल : राष्ट्रवादीचे जयंत पाटील 75186 मतांनी विजयी, अपक्ष अभिजित पाटील यांचा केला पराभव, काँग्रेसचे जितेंद्र पाटील तिसऱ्या स्थानावर 

- सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे 5500 मतांनी आघाडीवर 
- तासगाव मतदारसंघात अकराव्या फेरीअखेरीस राष्ट्रवादीचे आर आर पाटील 16188 मतांनी आघाडीवर
- चंदगड मतदारसंघात नवव्या फेरीअखेरीस राष्ट्रवादीच्या संध्यादेवी कुपेकर 21019 मतांनी आघाडीवर

LIVE UPDATE : सकाळी 11.30
- कसबा मतदारसंघाचा निकाल : भाजपचे गिरीश बापट 42000 मतांनी विजयी, मनसेच्या रविंद्र धांगरेकर यांना पछाडलं.
- शिर्डी मतदारसंघाचा निकाल : काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील 12000 मतांनी विजयी, भाऊसाहेब वाकचौरे यांना पछाडलं.

- श्रीरामपूर मतदारसंघात तेराव्या फेरीअखेरीस काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे 12000 मतांनी आघाडीवर, भाजपचे भाऊसाहेब वाकचौरे पिछाडीवर
- बारामती मतदारसंघात आठव्या फेरीअखेरीस राष्ट्रवादीचे अजित पवार 50281 मतांनी आघाडीवर 
- शिरुर मतदारसंघात दहाव्या फेरीअखेरीस भाजपचे बाबुराव पाचारणे 10000 मतांनी आघाडीवर 
- आंबेगाव मतदारसंघात नवव्या फेरीअखेरीस राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील 34476 मतांनी आघाडीवर 
 
LIVE UPDATE : सकाळी 11.15
- जत मतदारसंघात सोळाव्या फेरीअखेरीस  भाजपचे विलासराव जगताप 11893 मतांनी आघाडीवर
- पाटण मतदारसंघात पाचव्या फेरीअखेरीस राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर 995 मतांनी आघाडीवर
- शिराळा मतदारसंघात दहाव्या फेरीअखेरीस भाजपचे शिवाजीराव नाईक 1854 मतांनी आघाडीवर
- इंदापूर मतदारसंघात आठव्या फेरीअखेरीस हर्षवर्धन पाटील 10741 मतांनी पिछाडीवर, पराभवाच्या छायेत

LIVE UPDATE : सकाळी 11.00
- सांगोला मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेरीस सेनेचे शहाजी पाटील आघाडीवर
- नेवासा मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब मुरकुटे आघाडीवर
- कर्जत जामखेड मतदारसंघात सहाव्या फेरीअखेरीस भाजपचे राम शिंदे 27678 मतांनी आघाडीवर
- श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे आघाडीवर
- अकोला मतदारसंघात राष्ट्रवादीचे वैभव पिचड आघाडीवर
- पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुजित झावरे आघाडीवर
- राहुरी मतदारसंघात सेनेचे डॉ. उषाताई तानपुरे आघाडीवर
- शिवाजीनगर मतदारसंघात सातव्या फेरीअखेरीस भाजपचे विजय काळे 7715 मतांनी आघाडीवर
- कागल मतदारसंघात सेनेचे संजय घाटगे 7582 मतांनी आघाडीवर
- शिरोळ मतदारसंघात सेनेचे उल्हास पाटील 11025 मतांनी आघाडीवर

LIVE UPDATE : सकाळी 10.45
- दक्षिण कराड मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण 14095 मतांनी आघाडीवर, विलासकाका उंडलकर पिछाडीवर
- हातकणंगले मतदारसंघात दहाव्या फेरीअखेरीस सेनेचे सुजित मिंचेकर 11792 मतांनी आघाडीवर
- भोसरी मतदारसंघात आठव्या फेरीअखेरीस सेनेच्या सुलबा उबाळे 3900 मतांनी आघाडीवर
- अक्कलकोट मतदारसंघात सहाव्या फेरीअखेरीस काँग्रेसचे सिद्धराम म्हत्रे 4000 मतांनी आघाडीवर
- सोलापूर मध्य मतदारसंघात  सेनेचे महेश कोठे 2013 मतांनी आघाडीवर, प्रणिती शिंदे पिछाडीवर 
- जुन्नर मतदारसंघात मनसेनं खातं उघडलं... शरद सोनवणे विजयी, शिवसेनेच्या आशा बुचके यांना पछाडलं

LIVE UPDATE : सकाळी 10.30
- सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंग भोसले 9604 मतांनी आघाडीवर
- शिराळा मतदारसंघात भाजपचे शिवाजीराव नाईक 1776 मतांनी आघाडीवर
- कराड दक्षिण मतदारसंघात अपक्ष विलासकाका उंडाळकर 1400 मतांनी आघाडीवर, पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर
- पाटण मतदारसंघात सेनेचे शंभुराजे देसाई 180 मतांनी आघाडीवर, 
- वाई मतदारसंघात राष्ट्रवादीचे मकरंद जाधव-पाटील 4600 मतांनी आघाडीवर
- खानापूर मतदारसंघात सेनेचे अनिल बाबर 7090 मतांनी आघाडीवर
- शाहुवाडी मतदारसंघात सहाव्या फेरीअखेरीस सेनेचे सत्यजित पाटील 9301 मतांनी आघाडीवर
- शिरोळ मतदारसंघात राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील 1792 मतांनी आघाडीवर
- पलुस कडेगाव मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेरीस काँग्रेसचे पतंगराव कदम 104 मतांनी आघाडीवर
- इस्लामपूर मतदारसंघात आठव्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे जयंत पाटील 35000 मतांनी आघाडीवर
- कर्जत जामखेड मतदारसंघात सहाव्या फेरीअखेरीस भाजपचे राम शिंदे 11000 मतांनी आघाडीवर

LIVE UPDATE : सकाळी  10.15
- श्रीगोंदा मतदारसंघात सहाव्या फेरीअखेरीस राष्ट्रवादीचे राहुल जगताप 1380 मतांनी आघाडीवर
- अहमदनगर मतदारसंघात आठव्या फेरीअखेरीस भाजपचे अभय आगरकर 21082 मतांनी आघाडीवर
- मावळ मतदारसंघात आठव्या फेरीअखेरीस भाजपचे संजय (बाळा) भेगडे 9096 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचे माऊली दाभाडे पिछाडीवर
- पिंपरी मतदारसंघात आठव्या फेरीअखेरीस सेनेचे गौतम चाबुकस्वार 2434 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे पिछाडीवर
- इंदापूर मतदारसंघात चौथ्या फेरीअखेरीस राष्ट्रवादीचे दत्ता भरणे 6322 मतांनी आघाडीवर, हर्षवर्धन पाटील  पिछाडीवर
- राहुरी मतदारसंघात पाचव्या फेरीअखेरीस सेनेच्या उषा तानपुरे 3665 मतांनी आघाडीवर, शिवाजीराव कर्डीले पिछाडीवर 
- संगमनेर मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेरीस काँग्रेसचे बाळासाहेब थोरात 13434 मतांनी आघाडीवर

LIVE UPDATE : सकाळी  10.00
- इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे दत्ता भरणे आघाडीवर, हर्षवर्धन पाटील पिछाडीवर
- शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील नवव्या फेरीअखेरीस 25500 मतांनी आघाडीवर, सेनेचे अभय शेळके पिछाडीवर
- नेवासा मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेरीस भाजपचे बाळासाहेब मुरकुटे 1289 मतांनी आघाडीवर, सेनेचे साहेबराव घाडगे पिछाडीवर
- कोपरगाव मतदारसंघात चौथ्या फेरीअखेरीस भाजपच्या स्नेहलता कोल्हे 5176 मतांनी आघाडीवर
- जत मतदारसंघात भाजपचे विलासराव जगताप आघाडीवर
- तासगाव मतदारसंघात चौथ्या फेरीअखेरीस राष्ट्रवादीचे आर आर पाटील 4282 मतांनी आघाडीवर

LIVE UPDATE : सकाळी  9.45
- वाई मतदारसंघात राष्ट्रवादीचे मकरंद जाधव-पाटील 1657  मतांनी आघाडीवर
- कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेरीस काँग्रेसचे सतेज (बंटी) पाटील 572 मतांनी आघाडीवर
-  कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे 5661 मतांनी आघाडीवर
- हातकणंगले मतदारसंघात सेनेचे सुजित मिंचेकर 7738 मतांनी आघाडीवर
- इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे जयंत पाटील 15000 मतांनी आघाडीवर
- मोहोळ मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेरीस राष्ट्रवादीचे रमेश कदम आघाडीवर
- श्रीगोंदा मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेरीस सेनेचे शशिकांत गाडे आघाडीवर
- संगमनेर मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आघाडीवर
- राहुरी मतदारसंघात भाजपचे शिवाजीराव कर्डिले 2500 मतांनी आघाडीवर

LIVE UPDATE : सकाळी  9.30
- तासगाव मतदारसंघात पहिल्या फेरीअखेरीस भाजपचे अजितराव घोरपडे  792 मतांनी आघाडीवर
- शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील दुसऱ्या फेरीअखेरीस 4209 मतांनी आघाडीवर, सेनेचे अभय शेळके पिछाडीवर
- कोपरगाव मतदारसंघात भाजपच्या स्नेहलता कोल्हे 1875 मतांनी आघाडीवर
- अकोले मतदारसंघात पहिल्या फेरीअखेरीस वैभव पिचड 800 मतांनी आघाडीवर
- इचलकरंजी मतदारसंघात पहिल्या फेरीअखेरीस भाजपचे सुरेश हळवणकर आघाडीवर
- राधानगरी मतदारसंघात पहिल्या फेरीअखेरीस सेनेचे प्रकाश आंबिटकर 2655 मतांनी आघाडीवर
- दक्षिण कराड मतदारसंघात पहिल्या फेरीअखेरीस काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण 2000 मतांनी आघाडीवर, विलासकाका उंडलकर पिछाडीवर
- मिरज मतदारसंघात भाजपचे सुरेश खाडे 500 मतांनी आघाडीवर
- वाई मतदारसंघात राष्ट्रवादीचे मकरंद जाधव आघाडीवर
- फलटण मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिपक चव्हाण आघाडीवर

LIVE UPDATE : सकाळी  9.15
- तासगाव मतदारसंघात आर आर पाटील  1424 मतांनी आघाडीवर
- शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादीचे अशोक पवार 2000 मतांनी आघाडीवर
- शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसचे विनायक निम्हण आघाडीवर
- पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळा आघाडीवर, काँग्रेसचे अभय छाजेड दुसऱ्या क्रमांकावर
- दौंड मतदारसंघात पहिलाय फेरीअखेरीस रासपचे राहुल कूल 4500 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचे रमेश थोरात दुसऱ्या क्रमांकावर 
- पुरंदर मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे आघाडीवर
- खेड आळंदी मतदारसंघात पहिल्या फेरीअखेरीस शिवसेनेचे सुरेश गोरे आघाडीवर
- वडगाव शेरी लमतदारसंघात शिवसेनेचे सुनिल टिंगरे 1100मतांनी आघाडीवर, बापू पाठारे पिछाडीवर
- जुन्नर मतदारसंघात चौथ्या फेरीअखेरीस राष्ट्रवादीचे अतुल बोनके 8144 मतांसह आघाडीवर, मनसेचे शरद सोनावणे पिछाडीवर

LIVE UPDATE : सकाळी  9.00
- सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे दिलीप माने 2727 मतांनी आघाडीवर
- कोल्हापूर दक्षिण भाजपचे अमल महाडीक आघाडीवर, काँग्रेसचे सतेज पाटील पिछाडीवर
- बार्शी मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिलीप सोपल 170 मतांनी आघाडीवर
- अहमदनगर मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेरीस राष्ट्रवादीचे संग्राम जगताप 5690 मतांसह आघाडीवर, अनिल राठोड मागे
- शिराळा मतदारसंघात पहिल्या फेरीअखेरीस भाजपचे शिवाजीराव नाईक 310 मतांनी आघाडीवर 
- सांगली मतदारसंघात पहिल्या फेरीअखेरीस शिवसेनेचे पृथ्वीराज पवार 700 मतांनी आघाडीवर 
- शेवगाव मतदारसंघात पहिलाय फेरीअखेरीस राष्ट्रवादीचे चंद्रशेखर घुले 9454 मतांसह आघाडीवर
- सोलापूर करमाळा मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेरीस राष्ट्रवादीच्या रश्मी बागल 2300 मतांनी आघाडीवर

LIVE UPDATE : सकाळी  8.50
- सोलापूर शहर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदे 135 मतांनी आघाडीवर
- सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून भाजपचे विजय देशमुख आघाडीवर
- तासगाव मतदारसंघात पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपचे अजितराव घोरपडे 792 मतांनी आघाडीवर
- चिंचवडमध्ये पहिल्या फेरीअखेरीस भाजपचे लक्ष्मणराव जगताप 263 मतांनी आघाडीवर
- इचलकरंजीमध्ये पहिल्या फेरीअखेरीस भाजपचे सुरेश हळवणकर 3000 मतांनी आघाडीवर
- पुणे खडकवासला मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेरीस भाजपचे भीमराव तापकीर आघाडीवर, दिलीप बराटे दुसऱ्या क्रमांकावर
- कोथरुड : दुसऱ्या फेरीअखेरीस मेधा कुलकर्णी 3000 मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीचे बाबुराव चांदेरे पिछाडीवर 

LIVE UPDATE : सकाळी  8.40
- हडपसरमध्ये भाजपच्या भाजपचे योगेश तिळेकर यांची आघाडी
- आंबेगाव मतदारसंघात पहिल्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील 4279 मतांनी आघाडीवर
- पुणे कॅन्टॉनमेंट मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर भाजपच्या दिलीप कांबळे यांची 1900 मतांनी आघाडी
- पर्वती मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर भाजपच्या माधुरी मिसाळ यांची 2000 मतांनी आघाडी
- खेड आळंदी मतदारसंघात शिवसेनेचे सुरेश गोरे 4486 मतांसह आघाडीवर, राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते 4420 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर.. गोरे 460 मतांनी पुढे 
- जुन्नर मतदारसंघात मनसेचे शरद सोनावणे 5000 मतांनी आघाडीवर

LIVE UPDATE : सकाळी  8.30
- शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील पहिल्या फेरीत 2900 मतांनी आघाडीवर
- कर्जत - जामखेड मतदारसंघातील भाजपचे राम शिंदे 2437 मतांनी आघाडीवर
- अहमदनगर शहर मतदारसंगात राष्ट्रवादीचे संग्राम जगताप 2710 मतांसह आघाडीवर, सेनेच्या राठोड यांना - 2278 मतं, तर भाजपच्या अभय आगरकर यांना 2308 मतं
- कसबा मतदारसंघात मनसेच्या रविंद्र धंगेकर यांची आघाडी... भाजपच्या गिरीश बापट यांना टाकलं मागे
- साताऱ्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात
- सोलापूर मतमोजणीला सुरुवात

LIVE UPDATE : सकाळी 8.20
- पोस्टल मतदानात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका अव्वल क्रमांकावर... इंदापूर जिल्ह्यात एकूण पोस्टल मतदान १३६९
- पुणे कॅन्टॉनमेंट मतदारसंघात भाजपच्या दिलीप कांबळे यांची २००० मतांनी आघाडी
- पर्वती मतदारसंघात पहिल्या फेरीअखेरीस भाजपच्या माधुरी मिसाळ यांची आघाडी
- पुण्यात ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरू
- अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघांची मतमोजणी सुरु
- खडकवासला आणि कोथरुडमध्ये ईव्हीएम मशीनमधल्या मतमोजणीला सुरुवात

LIVE UPDATE : सकाळी 8.10
- पुणे कॅन्टॉनमेंट मतदारसंघात काँग्रेसच्या रमेश बागवे यांना मागे टाकत भाजपच्या दिलीप कांबळे यांची आघाडी
- खडकवासला आणि कोथरुडमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात
- कराडमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात
- सांगली जिल्ह्यात पोस्टल मतमोजणीला सुरुवात

LIVE UPDATE : सकाळी 8.00 वाजता
- मतमोजणीला सुरुवात

मुंबई : विधानसभा निवडणूक २०१४ चे निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अर्थातच या निकालांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे तो महाराष्ट्राचा पश्चिम भाग...

पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा भागांचा पश्चिम महाराष्ट्रात समावेश होतो. एकूण मतदारसंघातंपै जवळपास ७१ मतदारसंघ या पश्चिम महाराष्ट्रात येतात... या भागातले मतदारसंघ आणि इथं उभे राहिलेल्या उमेदवारांच्या नावांवर नजर टाकली तर अनेक मातब्बर नेत्यांचं भविष्य या निवडणुकीत पणाला लागलेलं आपल्या लक्षात येईल. यातील केवळ पुणे जिल्ह्याच्या २१ मतदारसंघातं तब्बल ३०८ उमेदवार या निवडणुकीसाठी उभे आहेत.  

साखर कारखान्यांचं राजकारण आणि पाण्याचा प्रश्न हे इथल्या जनतेचे जिव्हाळ्याचे मुद्दे... या आणि इतर मुद्यांना हात घालून कुणी सरशी मिळवलीय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.