ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - जळगाव ग्रामीण

घरकुल घोटाळाप्रकरणी जळगावचे राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यानंतर जळगाव ग्रामीण या त्यांच्या मतदार संघात त्यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनी मतदार संघाची धुरा हाती घेतली आहे.

Updated: Oct 7, 2014, 09:32 PM IST
 title=

जळगाव : घरकुल घोटाळाप्रकरणी जळगावचे राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांना तुरुंगाची हवा खावी लागली. त्यानंतर जळगाव ग्रामीण या त्यांच्या मतदार संघात त्यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनी मतदार संघाची धुरा हाती घेतली आहे.

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - पुरंदर
शिवसेना - गुलाबराव पाटील
भाजप - पी. सी. पाटील
काँग्रेस - दिलीप पाटील
राष्ट्रवादी - गुलाबराव देवकर
मनसे - जामील देशपांडे / मुकुंद लोटे 

                
जळगाव ग्रामीण, या मतदार संघातून विधानसभेची निवडणूक जिंकणाऱ्या गुलाबराव देवकर यांची राज्याच्या मंत्रिमंडळातही वर्णी लागली होती. मात्र घरकुल घोटाळ्याप्रकरणी या मंत्रीमहोदयांना थेट तुरुंगाची हवा खावी लागली.

या मतदारसंघात धरणगाव आणि जळगाव या दोन तालुक्यातील सुमारे १८८ गावांचा समावेश आहे. मराठा, गुर्जर, माळी या समाजाच्या व्होट बॅंकेवर जो प्रभाव पाडेल, तोच विजयाची बाजी मारतो, असा इथला इतिहास आहे. गुलाबराव देवकर यांनी जनतेला फक्त आश्वासनेच दिली अशी बोचरी टीका विरोधक करताहेत.

विरोधकांचा हा आरोप देवकर यांच्या समर्थकांकडून फेटाळण्यात आलाय. 
- धरणगाव, म्हसावद रेल्वे उड्डाणपुलासाठी निधी
- बहिणाबाई स्मारकासाठी ६ कोटी रुपये निधी
- बालकवी ठोंबरे स्मारक,
- बहिणाबाई स्मारक, 
- क्रीडा संकुल,
- गिरणा नदीवरील गाढोदा पुलाचे काम

अशी तब्बल 170 कोटी रुपयांची विविध विकासकामे केल्याचा दावा गुलाबराव देवकर यांच्या समर्थकांकडून करण्यात येतोय. 

मतदार संघात झालेल्या विकासकामांबाबत नेते एकमेकांवर तोंडसुख घेत असले तरी इथल्या जनतेच्या समस्या वर्षानुवर्षे आहे तशाच आहेत.

- टेक्स्टटाईल पार्क उभारण्याची गरज
- पिण्याच्या पाण्याची समस्या 
- गावागावांना जोडणारे रस्ते, 
- उद्योगांना चालना देण्याची गरज
- उच्च शिक्षणाची पुरेशी व्यवस्था नाही

गुलाबराव देवकर कारागृहात असले तरी आगामी विधानसभेची निवडणूक लढण्यास पुन्हा उत्सुक असल्याचं सांगितलं जातंय. मात्र ऐनवेळी गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर यांचाही विचार होऊ शकतो. 

मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि सेना-भाजप युती यांच्यात बंडखोरीची शक्यता असून ऐनवेळी इतरही उमेदवार रिंगणात उतरू शकतात. त्यामुळे इथे चौरंगी लढत रंगण्याची चिन्ह दिसू लागलीयेत. 

लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोदी लाटेचा फायदा झाला होता. विधानसभेत त्याचं प्रतिबिंब उमटणार का, याचीच उत्सुकता सध्या जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चिली जाऊ लागलीय.
    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.