मुरलीकांत पेटकर यांना पद्मश्री पुरस्कार
विविध क्षेत्रातील दिग्गजांचा सरकारकडून पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात करण्यात येतो.
कृष्णा नदीकाठी मच्छीमारावर मगरीचा हल्ला
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठ हा मगरमिठीत आलाय. भिलवडी इथल्या कृष्णा नदीच्या पात्रात मच्छीमार अशोक नलावडे यांच्यावर मगरीनं हल्ला करून त्याना गंभीर जखमी केलंय.
धारावीत शिवसेना विरुद्ध काँग्रेसमध्येच चुरस
मुंबईतील सर्वात मोठ्ठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी मुख्य लढत होणार असून धारावी पुर्नविकासाच्या मुद्यावर दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
शिवडीत मनसे-शिवसेनेत कडवी झुंज
शिवडी मतदारसंघात शिवसेना आणि मनसेत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. सेना, मनसे उमेदवारांचा प्रचार सध्या शिगेला पोहचला आहे. शिवडी मतदारसंघाचा हा लेखाजोखा.
ऑडिट नागपूर जिल्ह्याचं...
महाराष्ट्राची उपराजधानी असं ज्या शहराची ओळख आहे. संत्रानगरी नागपूर, देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं हरीत शहर... भारताचा मध्य अशी अनेक वैशिष्ट्य लाभलेला नागपूर जिल्हा. राज्याच्या राजकीयपटलावर या जिल्ह्याला महत्त्व आहे.
ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - काटोल
काटोल विधानसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्यातील आणखी एक महत्वाचा मतदारसंघ... संत्रा उत्पादनासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. राजकीय दृष्ट्याविचार केल्यास काटोल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो.
ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - नागपूर उत्तर
राज्याचे रोजगार हमी आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांचा हा मतदारसंघ... काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा वेध घेणारा हा रिपोर्ट.
ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - नागपूर दक्षिण-पश्चिम
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरातला दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघ... देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विकासकामे केल्याचा दावा केलाय. तर विरोधकांचा त्यांच्या या दाव्यांवर आक्षेप आहे.
ऑडिट रत्नागिरी जिल्ह्याचं...
विस्तिर्ण समुद्र किनारा, नारळ-पोफळी आणि आंबाच्या बागांनी वेढलेला रत्नागिरी जिल्हा... पौराणिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या जिल्ह्याला तेव्हडंचं राजकीय महत्व आहे.
ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - रत्नागिरी
राज्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचं हे ऑडिट... मंत्रीपद मिळालेल्या उदय सामंत यांनी मतदार संघावर छाप तर पाडलीये. मात्र युतीची एकजूट त्यांच्यासाठी महागात पडू शकते.
ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - राजापूर
राजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसचा हात धरला आणि हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. मात्र पुढे राजन साळवींनी 2009 मध्ये पुन्हा इथं सेनेचा भगवा फडकवला.
ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - गुहागर
विद्यमान कामगारमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी फिक्स मानली जातेय. तर हा मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेकडे गेल्याने भाजपची गोची झाली आहे. मात्र तरीही भाजपचे डॉ. विनय नातू पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झालेत.
ऑडिट सांगली जिल्ह्याचं...
सांगली नाट्यपंढरी, सहकारपंढरी म्हणून जेवढी प्रसिद्ध तेव्हढीच क्रांतीकारकांची जवानांची नगरी म्हणूनही सांगलीची ओळख आणि राजकीय पटलावर चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले वसंतदादा पाटील हेही याच सांगली जिल्ह्याचे सुपूत्र.
ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - इस्लामपूर
सांगली जिल्ह्यातला इस्लामपूर मतदारसंघ म्हणजेच पूर्वीचा वाळवा मतदारसंघ. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ. विरोधकांना नामोहरम करण्यात प्रत्येकवेळी जयंत पाटील यशस्वी ठरले आणि म्हणूनच सलग पाच विधानसभा निवडणुकांमध्ये ते या मतदारसंघातून विजयी पताका मिरवत आहेत.
ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पलूस-कडेगाव
धक्कादायक निकाल देणारा मतदारसंघ म्हणून सांगली जिल्ह्यातल्या पलूस-कडेगाव मतदारसंघाची ओळख. स्वतः वनमंत्री पतंगराव कदम हे या मतदारसंघातून पाच वेळा विजयी झाले असले, तरी त्यांनाही तीन वेळा पराभूत व्हावं लागंलय. त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी पृथ्वीराज देशमुख यांनी यावेळी त्यांना कडवं आव्हान देण्याचं मनावर घेतल्याने लढत रंगतदार आहे हे निश्चित.
ऑडिट पालघर जिल्ह्याचं...
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात राजकीयपक्षांची असलेली ताकत आता आपण बघितलंय. आता आपण पाहणार आहोत काही मोजक्या मतदारसंघातील एकूण परिस्थिती.
ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - वसई
वसई विधानसभा मतदारसंघातही आगामी विधानसभा निवडणूकीत जोरदार चुरस पहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार विवेक पंडीत यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत केलं होतं.
ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पालघर
महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. एकाबाजूला विस्तिर्ण समुद्र किनारा तर दुस-या बाजूला डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगल अशी नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेला पालघर जिल्हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातो.
ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बोईसर
बोईसर विधानसभा मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात असलेला मतदारसंघ. विविध विकास कामे केल्याचा दावा विद्यमान आमदारांकडून केला जातोय तर आजही हा मतदारसंघ मूलभूत सेवा सुविधांपासून वंचीत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय.