ऑडीट मुंबई जिल्ह्यातील मतदारसंघांचं

मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मुंबईतील एकूण 36 मतदारसंघापैकी 10 मतदार संघ मुंबई शहर जिल्ह्यात येतात. त्यापैकी सहा मतदारसंघ हे काँग्रेसक़डे, दोन मनसेकडे आणि भाजप, राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक - एक मतदारसंघ आहेत. 

Updated: Oct 7, 2014, 06:24 PM IST
 title=

मुंबई : मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर मुंबईतील एकूण 36 मतदारसंघापैकी 10 मतदार संघ मुंबई शहर जिल्ह्यात येतात. त्यापैकी सहा मतदारसंघ हे काँग्रेसक़डे, दोन मनसेकडे आणि भाजप, राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक - एक मतदारसंघ आहेत. 

गेली साडेचार दशकं मुंबईवर अधिराज्य गाजवणा-या शिवसेनेला मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत या 10 पैकी एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता.

काँग्रेसच्या वर्षा गायकवाड धारावी मतदारसंघाच्या आमदार आहेत. तर काँग्रेसचेच जगन्नाथ शेट्टी सायन कोळीवाड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत.

वडाळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कालीदास कोळंमकर आमदार आहेत. 

माहिम विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व मनसेचे नितीन सरदेसाई करत आहेत.

तर वरळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन अहिर आमदार आहेत.

शिवडी विधानसभा मतदार संघातून मनसेचे बाळा नांदगावकर हे प्रतिनिधीत्व करतात.

भायखळा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचीसत्ता असून इथं मधू चव्हाण हे आमदार आहेत.

मलबारहिल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व भाजपचे मंगलप्रभात लोढा करत आहेत.

तर मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल हे निवडून गेले आहे. 

कुलाबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या एनी शेखर आमदार आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.