तरूणीला पळवण्याच्या नादात १५ वर्षाचा मुलगा ठार

 सटाणा भागात एक धक्कादायक घटना घडलीय. कॉलेज तरूणींना बलेरो गाडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न चौघा तरूणांनी केला.. यापैकी एका तरूणीनं कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. पण दुसरी तरूणी त्या चौघांच्या तावडीत सापडली. 

Updated: Oct 20, 2016, 06:52 PM IST
तरूणीला पळवण्याच्या नादात १५ वर्षाचा मुलगा ठार title=

नाशिक :  सटाणा भागात एक धक्कादायक घटना घडलीय. कॉलेज तरूणींना बलेरो गाडीतून पळवून नेण्याचा प्रयत्न चौघा तरूणांनी केला.. यापैकी एका तरूणीनं कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. पण दुसरी तरूणी त्या चौघांच्या तावडीत सापडली. 

ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या बलेरो गाडीचा पाठलाग सुरू केला. या धावपळीत भरधाव बलेरोची धडक यज्ञेश काकुळते नावाच्या 15 वर्षांच्या मुलाला बसली आणि तो शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. 

सटाणा तालुक्यातील तळेगांव दिगर- किकवारी दरम्यान हा प्रकार घडला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी ती बलेरो गाडी पेटवून दिली आणि गाडीतल्या चौघा तरुणांना बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिलं.