उर्से टोलनाक्यावर तीन कोटींचे ड्रग्स सापडले

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या एका मोटारीमधून तीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ही कारवाई महसूल गुप्तचर संचलनालयाने सोमवार दुपारी एकच्या सुमारास केली.

Updated: Mar 9, 2015, 06:49 PM IST
उर्से टोलनाक्यावर तीन कोटींचे ड्रग्स सापडले title=

पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या एका मोटारीमधून तीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ही कारवाई महसूल गुप्तचर संचलनालयाने सोमवार दुपारी एकच्या सुमारास केली.

एका मोटारीमधून तीन कोटी रुपयांचे 50 किलो मेफेड्रोन या अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती महसूल गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. अधिका-यांनी या गाडीचा पाठलाग करून ही गाडी उर्से टोलनाक्याजवळ आडवली. या गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये अवैधरित्या तस्करी करण्यासाठी नेण्यात येणारे अमली पदार्थ सापडले. अंतरराष्ट्रीय बाजारत या अमली पदार्थांची किंमत तीन कोटी रुपये आहे. पकडण्यात आलेले अमली पदार्थ हे इतर अमली पदार्थांपेक्षा वेगळ्या प्रकारचे असून याची मागणी जास्त प्रमाणात आहे.

या प्रकरणी महसूल गुप्तचर संचलनालयाच्या मुख्य अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले. परंतु पकडण्यात आलेल्या ड्रग्जची तपासणी सुरू असून ही तस्करी करणा-या इसमाला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. चौकशी पूर्ण होताच याची संपूर्ण माहिती देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.