इराकमध्ये लातूरचे 4 तरुण अडकलेत

 इराकमध्ये सुरु असलेल्या संघर्षाची झळ आता महाराष्ट्रालाही जाणवू लागलीय. इराकच्या बसरा शहरात लातूर जिल्ह्यातले 4 तरुण अडकून पडलेत. निलंगा तालुक्यातले हे चारही तरुण असून त्यांची सुटका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

Updated: Jun 26, 2014, 09:50 PM IST
इराकमध्ये लातूरचे 4 तरुण अडकलेत title=

लातूर : इराकमध्ये सुरु असलेल्या संघर्षाची झळ आता महाराष्ट्रालाही जाणवू लागलीय. इराकच्या बसरा शहरात लातूर जिल्ह्यातले 4 तरुण अडकून पडलेत. निलंगा तालुक्यातले हे चारही तरुण असून त्यांची सुटका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. 

अशांततेनं धुमसत असलेल्या अस्वस्थ इराकमध्ये लातूर जिल्ह्यातले चार तरुण अडकून पडलेत. निलंगा तालुक्यातल्या आंबुलगा पौळ या गावाचे ज्ञानेश्वर भोसले, नितीन कांबळे, हालसी हात्तरगाचा बालाजी भोसले आणि शिरोढोणचा प्रमोद सोनवणे हे चार जण सध्या इराकमधल्या बसरा गावात अडकलेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. घराची परिस्थिती हालाखीची असल्यानं हे चौघे जण एका एजंटमार्फत इराकमध्ये मजुरीसाठी गेले होते. बसरामधल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीत हे सर्वजण मजूरी करतात.

अंबूलगा पौळ या भूकंपग्रस्त गावात अतिशय छोट्याशा घरात ज्ञानेश्वर आणि नितीनचे कुटुंबिय राहतात. ज्ञानेश्वरच्या घरी आई वडील, तीन भाऊ, पत्नी भावजय असा मोठा परिवार आहेत. तर नितीनच्या घरी आणि पत्नी असतात. आपल्या मुलांची सुटका करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबियांनी सरकारकडे केलीय.

इराकमध्ये अडकलेल्या या चारही तरुणांच्या कुटुंबियांना आपल्या मुलाशी कुठे संपर्क करावा याची कल्पना नाही. तसंच प्रशासकीय यंत्रणांनीही त्यांच्याशी कोणता संपर्क केलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारनंच या तरुणांच्या सुटकेसाठी तातडीनं पुढाकार घेण्याची गरज आता व्यक्त होतीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.