नांदेडमध्ये बस-ट्रक अपघातात ९ ठार, १२ गंभीर

नांदेडमध्ये बस-ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात ९ जण ठार तर १२ जण गंभीर झालेत. नांदेड विद्यापीठाजवळ शुक्रवारी मध्यरात्री वऱ्हाडाच्या बसला हा अपघात झाला.

Updated: Jun 6, 2015, 03:33 PM IST
नांदेडमध्ये बस-ट्रक अपघातात ९ ठार, १२ गंभीर  title=

नांदेड : नांदेडमध्ये बस-ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात ९ जण ठार तर १२ जण गंभीर झालेत. नांदेड विद्यापीठाजवळ शुक्रवारी मध्यरात्री वऱ्हाडाच्या बसला हा अपघात झाला.

भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. बसमधील प्रवासी नांदेड येथील बरड गावचे रहिवासी होते. कर्नाटकमधील गुलबर्गा येथील लग्नसमारंभासाठी वऱ्हाडाच्या दोन बस जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने एका बसला धडक दिली. 

अपघात एवढा भीषण होता की बसचे छत उडून गेले आणि बसचा चक्काचूरही झाला. रात्रीच्या सुमारास रस्त्यावर रहदारी कमी होती. अपघात रात्री झाल्याने जखमींना मदत मिळण्यासही उशीर झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.