मुंबई रस्ते घोटाळ्यातील दोषींनाच नागपुरात कंत्राटं

मुंबई महापालिकेतल्या रस्ते घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदाराला नागपूर महापालिकेतही काम मिळाल्याचं उघड झालंय. रस्ते घोटाळा प्रकरणात या कंत्राटदारावर गुन्हाही दाखल झाला आहे. 

Updated: Oct 19, 2016, 05:09 PM IST
मुंबई रस्ते घोटाळ्यातील दोषींनाच नागपुरात कंत्राटं title=

नागपूर : मुंबई महापालिकेतल्या रस्ते घोटाळ्यात दोषी आढळलेल्या कंत्राटदाराला नागपूर महापालिकेतही काम मिळाल्याचं उघड झालंय. रस्ते घोटाळा प्रकरणात या कंत्राटदारावर गुन्हाही दाखल झाला आहे. 

नागपूर महापालिकेनं रस्त्यांची सुमारे 34 कोटींची कामं आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्टला मंजूर केल्याची माहिती आरटीआय अंतर्गत समोर आली आहे. ही कामं मंजूर करतांना ठेकेदाराची वादग्रस्त पार्श्वभूमी महापालिकेनं लक्षात घेतलेली नाही असा आरोप करण्यात येत आहे. मनसेच्या स्थानिक पदाधिका-यांनी या कामाला विरोध दर्शवला आहे. स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांकडून समाधानकारक उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप मनसे पदाधिका-यांनी केलाय. तर हा प्रकार लक्षात आल्यावर या कंत्राटदाराची माहिती तपासत असल्याची सारवासारव नागपूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतींनी केली आहे.