धक्कादायक: दारूड्या नवऱ्यानं पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलं

महाराष्ट्रात पुन्हा एक धक्कादायक घटना घडलीय. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलंय. अहमदनगर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय.

Updated: Aug 12, 2015, 05:27 PM IST
धक्कादायक: दारूड्या नवऱ्यानं पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलं title=

अहमदनगर: महाराष्ट्रात पुन्हा एक धक्कादायक घटना घडलीय. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार आहे. एका दारूड्या नवऱ्यानं आपल्या पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलंय. अहमदनगर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय.

अहमदनगर जिल्ह्यातील खांडके गावातील रावसाहेब चिमटे हा व्यक्ती मंगळवारी रात्री दारू पिऊन घरी आला. पत्नी घराबाहेर झोपल्याचं पाहताच भडकलेल्या या दारूड्या नवऱ्यानं पत्नीच्या गुप्तांगावर अॅसिड फेकलं. 

अॅसिड हल्ला झाल्याबरोबर पत्नीनं आरडाओरडा केला. शेजाऱ्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं. दरम्यान, पोलिसांनी आरोपी रावसाहेब चिमटेला अटक केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.