ग्रामपंचायतीला दूषित पाणीपुरवठा, १.६० लाखांचा दंड अधिकाऱ्यांकडून वसूल

मलकापूर ग्रामपंचायतीला दूषित पाणीपुरवठा प्रकरणी १.६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हा ऐतिहासिक निकाल दिला. ग्राहक मंच न्यायालयाने ठोठावलेला दंड दोषी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक पैशांतून होणार वसूल होणार आहे.

Updated: Dec 13, 2016, 09:32 PM IST
ग्रामपंचायतीला दूषित पाणीपुरवठा,  १.६० लाखांचा दंड अधिकाऱ्यांकडून वसूल title=

अकोला : मलकापूर ग्रामपंचायतीला दूषित पाणीपुरवठा प्रकरणी १.६० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अकोला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने हा ऐतिहासिक निकाल दिला. ग्राहक मंच न्यायालयाने ठोठावलेला दंड दोषी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक पैशांतून होणार वसूल होणार आहे.

अकोला शहरालगतच्या मलकापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून नागरिकांना सतत दूषित पाण्याचा पुरवठा सुरू होताय. यावर्षी फेब्रूवारी महिन्यात तर ग्रामपंचायतने कहरच केलाय. ग्रामपंचायतचने पाणीपुरवठा केलेल्या पाण्यातून चक्क मासाचे तुकडे निघाले होतेय. या भागातील नागरिकांनी याची तक्रार ग्रामपंचायतीकडे केलीय. मात्र, ग्रामपंचायतने तक्रारीकडे दुर्लक्ष केलेय. त्यामुळे मार्च २०१६ मध्ये यातील आठ नागरिकांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली.

ग्राहकमंचाने अवघ्या आठ महिन्यात या प्रकरणी निकाल देत चार अधिकाऱ्यांना दोषी ठरवत त्यांना आठही तक्रारदारांना प्रत्येकी वीस हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनी आतातरी शुद्ध पाणीपुरवठा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

तक्रारदार रेखा काळे यांनी नागरिकांची बाजू स्वत: ग्राहकमंचात मांडलीय, आणि हे प्रकरण तडीस नेले. मलकापूर ग्रामपंचायतीचा आता अकोला महापालिकेत समावेश झाला. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांमध्ये तत्कालिन मलकापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, गुणवत्ता सल्लागार आणि अतिरिक्त आरोग्य अधिकार्यांचा समावेश आहे. 

ग्राहक मंच न्यायालयाने ठोठावलेला दंड दोषी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक पैशांतून होणार वसूल.  होणार आहे. नागरिकांना त्यांच्या मुलभूत सुविधांसंदर्भातील अधिकार आजही माहीत नाहीय. नेमकं याच गोष्टीमुळे नोकरशाहीतील 'चलता है' या प्रव्रूत्तींचं फावत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक-ग्राहक जागृत  झाल्यास अशा प्रकारांना नक्कीच आळा बसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.