बनावट फेसबुक अकाऊंट उघडून महिलांना अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्याला अटक

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमातून जग खूप जवळ आलंय. मात्र, त्याच्या गैरवापराच्या बातम्याही दररोज आपल्या कानी पडतच असतात. अकोल्यात अशाच एका प्रकरणात अमोल खराबे या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 

Updated: Aug 23, 2015, 08:24 PM IST
बनावट फेसबुक अकाऊंट उघडून महिलांना अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्याला अटक title=

अकोला: फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमातून जग खूप जवळ आलंय. मात्र, त्याच्या गैरवापराच्या बातम्याही दररोज आपल्या कानी पडतच असतात. अकोल्यात अशाच एका प्रकरणात अमोल खराबे या भामट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 

'श्रीमंत' घरातील महिलांचे फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करायचे. त्यावरून त्यांच्या मैत्रीणींशी चॅटिंग करायची अन मोबाईल नंबर घ्यायचा. अन त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून त्यांना अश्लील संदेश पाठवायचे, अशी त्याची 'मोड्स ऑपरेंडी... 

अकोल्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुनील हातेकर यांची पत्नी लीना हातेकर यांच्या नावाच्या बोगस फेसबुक अकाऊंटवरून अमोलचा हा 'गोरखधंदा' सुरू होता. अकोल्यातील सिव्हिल लाईन
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून अमोल खराबे या भामट्याला अटक केलीये.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.