'अपघात'वार: मुंब्रा बायपासवर अमोनिया गॅसने भरलेला टँकर कोसळला

आज अपघाताची ही तिसरी बातमी आहे. सुरतहून तळोज्याला जाणाऱ्या अमोनिया गॅसनं भरलेल्या टँकरला अपघात झाला आहे. टँकरमध्ये १४५० टन अमोनिया गॅस होता. 

Updated: May 24, 2015, 04:49 PM IST
'अपघात'वार: मुंब्रा बायपासवर अमोनिया गॅसने भरलेला टँकर कोसळला title=

ठाणे : आज अपघाताची ही तिसरी बातमी आहे. सुरतहून तळोज्याला जाणाऱ्या अमोनिया गॅसनं भरलेल्या टँकरला अपघात झाला आहे. टँकरमध्ये १४५० टन अमोनिया गॅस होता. 

आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपासवरुन जात असताना टँकर कोसळला.
ठाणे महापालिकेच्या आपात्कालिन कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
 
अपघातानंतर टँकर हलवलताना टँकरचा वॉल्व निघाला आणि गॅसगळती सुरु झाली आहे. त्यामुळं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळं सैनिकनगर, कौसा भागातील रहिवाशांना हलवण्यात आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.