चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनंच पळवलं

उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे इथं चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन पळवलंय. आयडीबीआय बँकेचं हे एटीम असून मशीनमध्ये असलेली पाच लाखांची रक्कमही चोरट्यांनी लंपास केलीय.

Updated: Jan 9, 2016, 05:06 PM IST
चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनंच पळवलं title=

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे इथं चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन पळवलंय. आयडीबीआय बँकेचं हे एटीम असून मशीनमध्ये असलेली पाच लाखांची रक्कमही चोरट्यांनी लंपास केलीय.

दुचाकी टायर्सचा वापर करुन हे मशीन पळवण्यात आलंय. विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमे-याची तोडफोड करुन इनबील्ट हार्डडिस्क मशीनसह पळवलीय. 

आयडीबीआय बँकेची 100 एटीएम्स ईपीएस या कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आलीत. तर पैसे डिपॉजिट करण्याचं टेंडर सिस्कोकंपनीला देण्यात आलंय. मात्र व्यवस्थापनाची जबाबदारी असणा-या ईपीएस कंपनीनं एटीएम मशीनला फाउंडेशन केलेलं नव्हतं. तर सिक्युरीटी गार्डनव्हता आणि अलार्म अलर्टही बसवलेले नाहीत. त्यामुळं चोरट्याचं फावलं.