गतिमंद मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

पिंपरी चिंचवड  अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार होण्याची धक्कादायक घटना समोर आलीय. शहराच्या वाल्हेकरवाडी भागात हा प्रकार घडलाय.  

Updated: Apr 9, 2015, 01:48 PM IST
गतिमंद मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार title=

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड  अल्पवयीन गतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार होण्याची धक्कादायक घटना समोर आलीय. शहराच्या वाल्हेकरवाडी भागात हा प्रकार घडलाय.  

खलील कुणबी शेख या वीस वर्षीय तरुणान हे दुष्कृत्य केलंय. त्याला चिंचवड पोलिसांनी अटक केलीय. खलील हा पिडीत मुलाच्या शेजारी राहतो. गेली वर्षभर तो शेजारी असलेल्या गतीमंद मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता.

याबाबत या गतीमंद मुलान कुटुंबियांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न तोकडे पडले. दरम्यान, काल दुपारी पीडित मुलगा एकटाच घरी असताना खलील त्याठिकाणी आला. त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायला सुरुवात केली. हा प्रकार पिडीत मुलाच्या भावाने खिडकीतून पाहिला. त्यानंतर मुलाच्या भावान पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर  प्रकार समोर आल्याचे चिंचवडचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखऱ सांगळे यांनी सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.