पुण्यात 'बाजीराव मस्तानी' रिलीज होऊ देणार नाही - पेशवे आक्रमक

उद्यापासून प्रदर्शित होणा-या बाजीराव मस्तानी चित्रपटाचा वाद आता चांगलाच चिघळणाराय... या चित्रपटाचा शो पुण्यात होऊ देणार नाही, असा इशारा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठाननं दिलाय. 

Updated: Dec 17, 2015, 08:28 PM IST
पुण्यात 'बाजीराव मस्तानी' रिलीज होऊ देणार नाही - पेशवे आक्रमक  title=

पुणे : उद्यापासून प्रदर्शित होणा-या बाजीराव मस्तानी चित्रपटाचा वाद आता चांगलाच चिघळणाराय... या चित्रपटाचा शो पुण्यात होऊ देणार नाही, असा इशारा थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठाननं दिलाय. 

संजय लीला भन्साळींकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप पेशवे कुटुंबियांना केलाय. 

बाजीराव मस्तानी शोसाठीचं साधं निमंत्रणही भन्साळींनी दिलं नाही, भन्साळी आमचा फोनही उचलत नाहीत, पेशवे कुटुंबियांशी बोलण्यास भन्साळी टाळाटाळ करतायत, त्यामुळं चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा इशारा प्रतिष्ठाननं दिलाय.