राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरच्या मद्यविक्रीवर निर्बंध

राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत नवीन मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत.

Updated: Dec 22, 2016, 08:26 PM IST
राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरच्या मद्यविक्रीवर निर्बंध title=

मुंबई : राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत नवीन मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

हे निर्बंध राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या अंतर्गत असलेल्या महानगरपालिका, शहर, गाव, किंवा स्थानिक प्राधिकरण यांना लागू राहतील. यापूर्वी मंजूरी मिळून देण्यात आलेला मद्यविक्री परवाना दिनांक 31 मार्च 2017 पर्यंत कार्यान्वयीत राहतील. पण एक एप्रिल 2017 नंतर मद्यविक्री परवाना नूतनीकरण करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

राष्ट्रीय व राज्य महामार्गावर मद्याचे चिन्ह किंवा मद्य उपलब्ध असल्याबाबत जाहिरातीवरही निर्बंध टाकण्यात आले आहे. अशा जाहिराती व चिन्ह तात्काळ काढून टाकण्यात यावेत असे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून मद्याविक्रीचे परवाने दिसू नये किंवा सहजरित्या जाणाऱ्या मार्गावर परवाने असू नये आणि राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या बाहेरील काठापासून किंवा सेवारोड पासून 500 मीटरच्या आत मद्यविक्री परवाने नसावे असं या नियमावलीत नमूद करण्यात आलं आहे.