बीड जिल्हा बँक प्रकरणी संचालकाला जामीन, धनंजय मुंडेंना दिलासा

जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणात आज माजी संचालक पांडुरंग गाडे यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Updated: Jul 15, 2016, 10:05 PM IST
बीड जिल्हा बँक प्रकरणी संचालकाला जामीन, धनंजय मुंडेंना दिलासा  title=

बीड : जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळा प्रकरणात आज माजी संचालक पांडुरंग गाडे यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आरोपी संचालकांना अटक करण्यापूर्वी ७२ तास अगोदर त्यांना नोटीस द्यावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले असल्याचे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितले. कोर्टाच्या या आदेशामुळे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, खासदार रजनी पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

जिल्हा बँक प्रकरणात विशेष तपास पथकाने बड्या राजकीय नेत्यांसहीत तब्बल १०५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. १४२ कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने धनंजय मुंडे , अमरसिंह पंडित, रजनी पाटील यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती.
 
दरम्यान याच प्रकरणातील एक आरोपी माजी संचालक पांडुरंग गाडे यांना बीडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पानसरे यांनी जामीन  मंजूर केला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात कोणत्याही आरोपीला अटक करण्यापूर्वी ७२ तास अगोदर नोटीस द्या असेही म्हटले आहे.