पिंपरी-चिंचवडच्या प्रभाग क्र.६ ड मधून भाजपचे रवी लांडगे बिनविरोध

राज्यातील १० महानगरपालिका तसेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितींचे निकाल काही वेळातच जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२७ जागांसाठीचे निकाल लवकरच जाहीर होतायत. 

Updated: Feb 23, 2017, 09:11 AM IST
पिंपरी-चिंचवडच्या प्रभाग क्र.६ ड मधून भाजपचे रवी लांडगे बिनविरोध title=

पिंपरी-चिंचवड : राज्यातील १० महानगरपालिका तसेच जिल्हापरिषद आणि पंचायत समितींचे निकाल काही वेळातच जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १२७ जागांसाठीचे निकाल लवकरच जाहीर होतायत. 

पिंपरी-चिंचवडमधील १२७ जागांसाठी तब्बल ७७४ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र मतमोजणी सुरु होण्याआधीच प्रभाग क्रमांक ६ ड मधील निकाल जाहीर झालाय. 

या वॉर्डमधून भाजपचे रवी लांडगे बिनविरोध विजयी झालेत. त्यामुळे आता महापालिकेतील उऱलेल्या १२७ जागांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.