उल्हासनगर येथे सार्वजनिक शौचालय टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत पडून ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Updated: Oct 10, 2015, 09:59 PM IST
उल्हासनगर येथे सार्वजनिक शौचालय टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू title=

उल्हासनगर : शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत पडून ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

तनेश जोगदंडे असे या बालकाचे नाव आहे. तो टाकी शेजारी खेळत असताना ही दुर्घटना घडली. गेल्या अनेक महिन्यानपासून या शौचालयाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय.

शांतीनगर परिसरात असलेल्या स्मशान भूमीच्या मागे महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाचे काम सुरु आहे. या शौचालयाच्या जवळ तनेश जोगदंडे काही मुलांसोबत खेळत होता. तनेश हा खेळत होता. त्यावेळी त्याचा तोल गेला. शौचालयाच्या टाकीचे झाकण उघडे असल्याने ही दुर्घटना घडली. याला ठेकेदार जबाबदार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने तनेशला बाहेर काढण्यात आले. चार ते पाच महिन्यांपूर्वी याच टाकीत एक लहान मुलगा पडून जखमी झाल्याची घटना घडली होती. मात्र तरीही प्रशासनास जाग आलेली नाही. मागणी करुनही महापालिका प्रशासनाचे  आणि ठेकेदाराने दुर्लक्ष केले. या घटनेस दोषी असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक नगेरसेवकाने केली आहे.
 
याबाबत उल्हासनगर मध्यवर्थी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा नोंद करण्यात आली आहे. जर तपासात ठेकेदार दोषी आढळल्यास त्याचावरही गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.