छत्रपती शिवरायांचा घोर अपमान, शिवप्रेमींमध्ये संताप

राज्यात युतीची राजवट सुरू असतानाच शिवरायांचा घोर अपमान होत असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड किल्ल्यावर मानवंदना देण्याची प्रथा गेल्या ५ वर्षांपासून खंडीत झाल्याची गंभीर बाब उजेडात आलीय. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळलीय. 

Updated: Dec 16, 2014, 10:37 AM IST
छत्रपती शिवरायांचा घोर अपमान, शिवप्रेमींमध्ये संताप  title=

मुंबई : राज्यात युतीची राजवट सुरू असतानाच शिवरायांचा घोर अपमान होत असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड किल्ल्यावर मानवंदना देण्याची प्रथा गेल्या ५ वर्षांपासून खंडीत झाल्याची गंभीर बाब उजेडात आलीय. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळलीय. 

रायगड किल्ल्यावर दररोज सकाळी पोलिसांच्यावतीनं छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्याची प्रथा आहे. चार पोलीस सकाळी रायगडावरच्या होळीच्या माळावर असलेल्या शिवरायांच्या पुतळयाला मानवंदना देतात. मात्र, आर्थिक तरतूद नसल्याचं कारण देत गेल्या 5 वर्षांपासून ही प्रथा बंद करण्यात आली. 

यासंदर्भात शिवप्रेमींकडून शासनदरबारी सतत पाठपुरावा करण्यात आला. मात्र, शासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही, असा शिवप्रेमींचा आरोप आहे. एकीकडे शेकडो कोटी रूपये खर्च करून समुद्रात शिवरायांचं भव्य स्मारक उभारण्याची तयारी सरकारकडून केली जात असताना रायगडासारखा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.