स्वच्छ भारत अभियान: चैतालीनं बाबांना मागितलं 'रेडीमेड' शौचालय

आज अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या नया अंदुरा गावात झालेलं एक लग्न 'स्वछ भारत' मोहिमेला एका नव्या अन सकारात्मक वळणावर नेणारं ठरलंय... कारण, या लग्नात वधूनं आपल्या पित्याकडे चक्क शौचालय आंदन देण्याचा अट्टहास धरला होता. अन वधूपित्यानंही स्वच्छतेत शौचालयाचं महत्व जाणत आपल्या मुलीला थेट 'रेडीमेड' शौचालयाचं आंदन देत एक इतिहास घडविलाय. 

Updated: May 15, 2015, 10:50 PM IST
स्वच्छ भारत अभियान: चैतालीनं बाबांना मागितलं 'रेडीमेड' शौचालय title=

अकोला: आज अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या नया अंदुरा गावात झालेलं एक लग्न 'स्वछ भारत' मोहिमेला एका नव्या अन सकारात्मक वळणावर नेणारं ठरलंय... कारण, या लग्नात वधूनं आपल्या पित्याकडे चक्क शौचालय आंदन देण्याचा अट्टहास धरला होता. अन वधूपित्यानंही स्वच्छतेत शौचालयाचं महत्व जाणत आपल्या मुलीला थेट 'रेडीमेड' शौचालयाचं आंदन देत एक इतिहास घडविलाय. 

चैताली गाळखे असं या वधूचं नाव आहे. चैतालीचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील मोझर गावच्या देवेंद्र माकोडे या तरुणाशी झालाय. नया अंदुरा गावानं आज स्वच्छ भारत मोहिमेच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात केलीये.
 
अभिनेत्री विद्या बालन जाहिरातीत देत असलेला संदेश अकोल्यात सत्यात उतरलाय. स्वच्छ भारत मोहिमेला एका नव्या उंचीवर नेणाऱ्या या लग्नात वधूनं एक नवा पायंडा पाडलाय. वधूपित्यानं आपल्या प्रिय कन्येसाठी रेडीमेड टॉयलेट भेट दिलंय. अकोल्यातल्या नया अंदुरा गावातल्या दिलीप गाळखे यांची कन्या चैतालीचा विवाह यवतमाळमधल्या तेर तालुक्यातल्या मोझर गावच्या देवेंद्र माकोडे याच्याशी झालाय. सासरी शौचालय नसल्याचं समजताच चैतालीनं आपल्या वडिलांकडे भेटवस्तू म्हणून रेडीमेड टॉयलेट देण्याचा आग्रह धरला. अन् आज चैतालीच्या लग्नातल्या आंदणाच्या आरासीत कधीकाळी सामाजिक चेष्टेचा विषय ठरलेलं 'शौचालय' मोठ्या दिमाखानं विराजमान झालं. चैतालीनं उचललेल्या या पावलाचं तिच्या पतीनंही कौतूक केलंय. 

या लग्नातून प्रेरणा घेतलेल्या मुलींनीही नवऱ्याकडे शौचालय सक्तीचा आग्रह धरणार असल्याचं म्हटलंय. 
नया अंदुरा गावानं आज स्वच्छ भारत मोहिमेमध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात केलीये. प्रत्येकानं आपली जबाबदारी समजून काम केल्यास भारत स्वच्छ देश म्हणून नावारुपाला यायला वेळ लागणार नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.