कर्जाच्या प्रत्येक पैशाला किंमत असते - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तरुण उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला. कर्जाच्या पैशाचे महत्त्व त्यांनी यावेळी तरुणांना पटवून दिले. 

Updated: Mar 26, 2017, 10:52 PM IST
कर्जाच्या प्रत्येक पैशाला किंमत असते - मुख्यमंत्री title=

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तरुण उद्योजकांना मोलाचा सल्ला दिला. कर्जाच्या पैशाचे महत्त्व त्यांनी यावेळी तरुणांना पटवून दिले. 

कर्ज मोफत नसतं, कर्जाच्या प्रत्येक पैशाला किंमत असते. कर्जाच्या रकमेचा योग्य वापर न करता त्यातून चैनीच्या वस्तू खरेदी केल्या तर तुमचे उद्योग बुडणार आणि तुम्ही कर्जबाजारी होणार असा कानमंत्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना दिला. 

नागपूर महापालिका आणि यूथ एम्पॉवरमेन्ट यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते.