महाविद्यालयात मिळतोय बेकायदेशीर प्रवेश - मुख्यमंत्र्यांची कबुली

राज्यातल्या काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पैसे घेऊन बेकायदेशीर प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचं, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलंय. 

Updated: Oct 8, 2016, 04:34 PM IST
महाविद्यालयात मिळतोय बेकायदेशीर प्रवेश - मुख्यमंत्र्यांची कबुली  title=

मुंबई : राज्यातल्या काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पैसे घेऊन बेकायदेशीर प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचं, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटलंय. 

अशा महाविद्यालयांवर कठोर फौजदारी करवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. अकोलामधल्या शासकीय मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमातल्या जाहीर सभेत ते बोलत होते. 

यावेळी नवीन शल्यशस्त्रक्रियागृहाचा लोकार्पण सोहळाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. दरम्यान, या कार्यक्रमाला येताना कोपर्डी बलात्कार घटना आणि मराठा आरक्षण प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून स्वतः त्या आंदोलकांशी चर्चा केली.