पुण्यातील धोकादायक वाडे पालिका पाडणार

पुणे शहरातील विविध भागात अतिधोकादायक असलेले ३३ वाडे आणि इमारती पडण्याची कारवाई महापालिका करणार आहे. शहरातील ९९१ वाडे आणि इमारती धोकादायक आहेत. महापालिकेनं केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही माहिती समोर आलीय… त्यामुळे हे वाडे आणि इमारती खाली करण्याच्या नोटीसा महापालिकेनं रहिवाश्यांना पाठविल्या आहेत. मात्र, अचानक जायचं कोठं असा प्रश्न या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसमोर निर्माण झालाय.

Updated: Jun 8, 2015, 08:55 PM IST
पुण्यातील धोकादायक वाडे पालिका पाडणार title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुणे शहरातील विविध भागात अतिधोकादायक असलेले ३३ वाडे आणि इमारती पडण्याची कारवाई महापालिका करणार आहे. शहरातील ९९१ वाडे आणि इमारती धोकादायक आहेत. महापालिकेनं केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही माहिती समोर आलीय… त्यामुळे हे वाडे आणि इमारती खाली करण्याच्या नोटीसा महापालिकेनं रहिवाश्यांना पाठविल्या आहेत. मात्र, अचानक जायचं कोठं असा प्रश्न या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांसमोर निर्माण झालाय.

पावसाळ्याच्या तोंडावर पुणे शहरातले वाडे आणि इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडीट महापालिकेनं केलं. यात धक्कादायक माहिती समोर आलीय. 991 वाडे आणि इमारती धोकादायक असल्याची माहिती समोर आलीय. त्यानंतर अतिधोकादायक वाडे आणि इमारतींवर महापालिकेने कारवाई सुरू केली.मात्र इथे राहणा-यांची कोणतीही सोय पालिकेने केली नाही. इथे राहणा-या नागरिकांना महापालिकेने यापूर्वी अनेकदा नोटीसा बजावल्या आहेत. आताही महापालिकेने नागरिकांना घरं रिकामी करण्यास सांगितलंय. अतिधोकादायक झाल्यामुळे अनेकांचे जीवही धोक्यात आले आहेत. पण महापालिकेच्या कारवाईला विरोधही होण्याची शक्यता आहे.

मागच्या वर्षीही शहरातल्या अतिधोकादायक वाड्यांना आणि इमारतींना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर 45 वाडे आणि इमारतींवर कारवाई केली गेली. आता 33 इमारती आणि वाड्यांवर केव्हाही हातोडा पडू शकतो. मात्र आधी पर्यायी जागा द्या, मगच तोडकाम करा अशी रहिवाशांची मागणी आहे.

धोकादायक होऊनही अनेक वाड्यात रहिवासी आहेत. वाडामालक आणि भाडेकरू यांच्यातले वाद हे त्यामागचं कारण आहे. अनेक ठिकाणी हे वाद कोर्टात गेलेत. त्यामुळे वाडे इमारतींचा पुनर्विकास रखडलाय. जागा सोडली तर जागेवरचा ताबा निघून जाईल या भितीने लोक जीव मुठीत घेऊन अशा इमारतीत राहात आहेत. मात्र महापालिकेच्या अशा भूमिकेमुळे नागरिकांना दुसरीकडे निवारा शोधावा लागला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.