आयआरबी कर्मचाऱ्यांची मुजोरी, चालकाला मारहाण

कोल्हापूरात टोल वसुली करत असताना आय आर बी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका चालकाला मारहाण केल्याची घटना घडलीय. त्यामुळं कोल्हापूरकर चांगलेच संतापलेत.

Updated: Nov 20, 2014, 09:06 PM IST
आयआरबी कर्मचाऱ्यांची मुजोरी, चालकाला मारहाण title=

कोल्हापूर : कोल्हापूरात टोल वसुली करत असताना आय आर बी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका चालकाला मारहाण केल्याची घटना घडलीय. त्यामुळं कोल्हापूरकर चांगलेच संतापलेत.

त्यानंतर ‘टोलविरोधी कृती समिती’च्या सदस्यांनी कळंबा इथल्या टोल नाक्यावर धाव घेत टोल नाक्यावरील टोल वसुली बंद पाडली. यावेळी महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या, त्यांनी टोल नाक्यावर वाहने आडवण्यासाठी लावलेले बॅरेकेड्स् काढून टाकत टोल वसुली बंद पाडली. त्यामुळे, पोलिसांना टोल नाक्यावरील बंदोबस्तात वाढ करावी लागलीय. 

आय आर बी कंपनीचे कर्मचारी हे वारंवार वाहनचालकांना धमकावून मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असा आरोप टोल विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी केलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.