अहो आश्चर्यम्... अवघ्या ५ रुपयांत ईसीजी

तुम्हांला ईसीजी काढायचा असेल कमीत कमी ५०० रुपये द्यावे लागतात, पण यासाठी आता असे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे की केवळ त्यासाठी ५ रुपये खर्च होणार आहे, विश्वास बसत नाही ना... पण हे खऱं आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून दिले. 

Updated: Jan 18, 2016, 11:03 PM IST
अहो आश्चर्यम्... अवघ्या ५ रुपयांत ईसीजी title=

पिंपरी-चिंचवड : तुम्हांला ईसीजी काढायचा असेल कमीत कमी ५०० रुपये द्यावे लागतात, पण यासाठी आता असे तंत्रज्ञान विकसीत झाले आहे की केवळ त्यासाठी ५ रुपये खर्च होणार आहे, विश्वास बसत नाही ना... पण हे खऱं आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावरून दिले. 

सध्या आरोग्याचे प्रश्न तर दिवसागणिक वाढताहेत आणि आरोग्यसुविधांच्या किंमतीही झपाट्याने वाढत चालल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान हे निश्चितपणे उपकारक ठरू शकते. या संदर्भात एक अॅप विकसीत झाले आहे. 

राहुल रस्तोगी या तरुण तंत्रज्ञाने त्यासाठी खास पद्धतीचे अॅप विकसीत केलेले आहे. त्याच्या नातलगाचे हृदयविकारानेच निधन झाले. तेव्हा त्याला त्याची निकड अधिक भासली. राहुलने वर्षभर मेहनत घेऊन मोबाईलसारखेच एक उपकरण विकसीत केले आहे. 

शरीरावर हे उपकरण सहा ठिकाणी स्पर्श केल्यानंतर त्या व्यक्तीचा इसीजी संबंधित डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅपवर जाईल आणि डॉक्टरांना रुग्णाच्या हृदयाची स्थिती एका सेकंदात समजू शकेल व तत्काळ उपाययोजना करून रुग्णाचा जीव वाचवणोही शक्य़ होऊ शकेल. विशेष म्हणजे हे अॅप त्याने अवघ्या ५ रुपयांना उपलब्ध करून दिले आहे. ही किमया केवळ विज्ञानाचीच आहे, असे मत डॉ. माशेलकरांनी व्यक्त केले. 

नोएडा स्थित राहुल रस्तोगी याने त्याच्या अगास्ता सॉफ्टवेअर या कंपनीच्या माध्यमातून हे अॅप विकसीत केले आहे. पोर्टेबल, क्रेडीट कार्ड आकाराच्या या इसीजी मॉनेटरला त्याने संकेत असे नाव दिले आहे. ब्लूटूथच्या माध्यमातून हे सॉफ्टवेअर स्मार्टफोनशी वायरलेस पद्धतीने जोडलेले असते. त्यातून हृदयाची सद्यस्थिती कशी आहे याचा अंदाज येऊ शकतो. 

अॅन्ड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही पद्धतीच्या स्मार्टफोनवर हे अॅप्लीकेशन चालू शकते. या माध्यमातून त्याने तंत्रज्ञानाच्या बळावर वेळ आणि पैसा दोन्हीची बचत करून दाखवली आहे. छातीत दुखणे, श्वास घेताना त्रास होणे, हृदयाचे ठोके अनियमित पडणे अशी लक्षणे आढळल्यास या अॅपचा तत्काळ वापर शक्य आहे आणि संबंधित डॉक्टरला त्याची माहिती तत्काळ व्हॉट्सअॅप, इमेलद्वारे कळू शकते.