खडसेंनी खटला बिनशर्त मागे घ्यावा- गुलाबराव पाटील

पाच कोटींच्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात तडजोड करण्यासाठी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 30, 2017, 10:23 PM IST
खडसेंनी खटला बिनशर्त मागे घ्यावा- गुलाबराव पाटील title=

जळगाव: सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या, पाच कोटींच्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात तडजोड करण्यासाठी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. 

खडसे आणि राज्यमंत्री पाटील यांच्यातील या बदनामीच्या खटल्यात कोर्टानेच मध्यस्थी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे तसेच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील कोर्टात हजर झाले. 

बदनामीचा खटला बिनशर्त मागे घ्यावा अशी मागणी गुलाबराव पाटलांनी केली आहे. खडसेंनी पॉलिहाऊसचे लाखो रुपयांचे सरकारी अनुदान लाटल्याचा आरोप गुलाबरावांनी केला होता. त्याचप्रकरणी न्यायालयात गुलाबरावांवर हा बदनामीचा खटला सुरु आहे.