महादेव जानकरांना जबरदस्त धक्का

निवडणूक अधिका-याला धमकावल्याप्रकरणी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना धक्का बसला आहे.

Updated: Dec 10, 2016, 09:25 PM IST
महादेव जानकरांना जबरदस्त धक्का  title=

मुंबई : निवडणूक अधिका-याला धमकावल्याप्रकरणी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना धक्का बसला आहे. जानकर गडचिरोलीच्या निवडणूक अधिका-याला काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज रद्द करावा तसेच उमेदवाराला कपबशी चिन्ह द्यावे म्हणून दबाव टाकत असल्याची क्लिप व्हायरल झाली होती.

निवडणूक आयोगानं याची दखल घेतली आहे. ज्या जेसा मोटवानीसाठी जानकरांनी दबाव टाकला त्या प्रभाग 9 ब ची निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. इथली निवडणूक स्वतंत्रपणे घेण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलंय. काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.