सोलापुरात गॅंगवॉर, तलवारीने जोरदार हल्लाबोल

दोन टोळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालेली पाहायला मिळाली. सोलापूरच्या सिव्हील शासकीय रुग्णालयात ही घटना घडली. सालार गँगच्या 40 ते 50 जणांनी जहागीरदार गँगच्या लोकांवर हल्ला तलवारीने हल्लाबोल केला. या 10 जण जखमी झालेत. 

Updated: Nov 5, 2016, 12:27 PM IST
सोलापुरात गॅंगवॉर, तलवारीने जोरदार हल्लाबोल title=

सोलापूर : दोन टोळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालेली पाहायला मिळाली. सोलापूरच्या सिव्हील शासकीय रुग्णालयात ही घटना घडली. सालार गँगच्या 40 ते 50 जणांनी जहागीरदार गँगच्या लोकांवर हल्ला तलवारीने हल्लाबोल केला. या 10 जण जखमी झालेत. 

किरकोळ वादातून सोलापूरमध्ये दोन टोळ्यांमध्ये  गॅंगवॉर उसळले. शहरातील सिव्हील शासकीय रुग्णालयात हल्लाबोल करण्यात आला. सालार गँगच्या 40 ते 50 जणांनी जहागीरदार गँगच्या लोकांवर हल्ला चढवला. यानंतर दोन्ही बाजूंकडून तलवारीने एकमेंकावर वार करण्यात आलेत.

या टोळी युद्धात दहा जण जखमी झाले असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास नई जिंदगी भागात झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसन अशाप्रकारे गॅंगवॉरमध्ये झाले. या घटनेनंतर शासकीय रुग्णालयात भीतीचं वातावरण पसरले आहे.