गोखले इन्स्टिट्यूटकडून मराठा समाजाच्या परिस्थितीचा अहवाल

पुण्याच्या गोखले इन्सिटीट्यूटकडून मराठा समाजाच्या सध्याच्या परिस्थितीबाबतचा अहवाल देण्यात आला आहे.

Updated: Dec 5, 2016, 10:06 PM IST
गोखले इन्स्टिट्यूटकडून मराठा समाजाच्या परिस्थितीचा अहवाल  title=

पुणे : पुण्याच्या गोखले इन्सिटीट्यूटकडून मराठा समाजाच्या सध्याच्या परिस्थितीबाबतचा अहवाल देण्यात आला आहे. गोखले इन्सिटीट्यूटनं मराठा समाजाचं जिल्हास्तरीय सर्वेक्षण केलं आहे. जवळपास सगळ्याच जिल्ह्यातील 80 टक्केहून अधिक मराठा समाज मागासलेला आहे, असं या सर्वेक्षणात समोर आलं आहे.  

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

- महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत मराठा समाज 32 टक्के आहे.

- आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी मराठा समाजाचे आहेत.

- कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी मराठा समाजाचे आहेत.

- मराठा समाजातील 80 टक्के कुटुंबाचे वार्षीक उत्पन्न 1 लाख रूपयांपेक्षा कमी आहे.

- चार्तुवर्ण व्यवस्थेत क्षत्रिय समाजात मराठा समाज मोडतो. इतर काही राज्यात क्षत्रिय मागासलेले आहेत. त्यामुळे मराठा समाजही मागास आहे.

- मराठा समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.

- सरकारी नोकरीमध्ये मराठा समाजाचा टक्का कमी आहे.

- राणे, केळकर समितीने मराठा समाज आर्थिक व सामाजिक मागास असल्याचे नमूद केले आहे.

-  50 टक्क्यांवर आरक्षण देता येते. केवळ ते पटवून देता आले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात नमूद केले आहे. मराठा समाज आर्थिक व सामाजिक मागास आहे. त्यामुळे त्यांना दिलेले आरक्षण योग्यच आहे.