धुळ्यातील नंदाळे बुद्रुक गावात अतिवृष्टी, १ ठार

नंदाळे बुद्रुक गावात मध्यरात्री अतिवृष्टी झाली. यावेळी मंदिरावर विज कोसळली. यात एक तरुण ठार तर 4 जण जखमी झालेत. ठार झालेल्या तरुणाचे संगम कृष्णा वाघ असे नाव असून तो 33 वर्षांचा होता. 

Updated: Sep 22, 2016, 05:58 PM IST
धुळ्यातील नंदाळे बुद्रुक गावात अतिवृष्टी, १ ठार title=

धुळे : नंदाळे बुद्रुक गावात मध्यरात्री अतिवृष्टी झाली. यावेळी मंदिरावर विज कोसळली. यात एक तरुण ठार तर 4 जण जखमी झालेत. ठार झालेल्या तरुणाचे संगम कृष्णा वाघ असे नाव असून तो 33 वर्षांचा होता. 

जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मंदिराच्या पत्र्याच्या शेडमध्ये 25 वर्षीय कमलेश भील, 33 वर्षीय शरद पाटील. 27 वर्षी नितीन भील 29 वर्षीय राहुल पाटील आणि 33 वर्षीय़ संगम वाघ झोपले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली.  

अतिवृष्टीमुळे जुन्या पाझर तलावाच्या सांडव्याजवळ भगदाड पडल्यानं पाणी गावातल्या शेतांमध्ये आलं. त्यामुळं शेतीचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. 

पुलावरून पाणी वाहत असल्यानं नंदाळे -बुद्रुक, नाणे-सिताने या गावांचा संपर्क तुटलाय. रात्री 11 ते पहाटे पाच दरम्यान नंदाळे बुद्रुक गावात 96 मिमी पावसाची नोंद झालीय.