जळगावात खडसे समर्थकांचं शक्तिप्रदर्शन

जिल्ह्यात एकनाथ खडसे समर्थकांनी शक्तिप्रदर्शन सुरू केलं आहे, जळगाव महापालिकेचे १५ नगरसेवक उद्या राजीनामा देणार आहेत.

Updated: Jun 1, 2016, 06:41 PM IST
जळगावात खडसे समर्थकांचं शक्तिप्रदर्शन title=

जळगाव : जिल्ह्यात एकनाथ खडसे समर्थकांनी शक्तिप्रदर्शन सुरू केलं आहे, जळगाव महापालिकेचे १५ नगरसेवक उद्या राजीनामा देणार आहेत.

हे सर्व नगरसेवक भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत. 

खडसेंवर मागील १५ दिवसांपासून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. खडसेंनी महसूल मंत्रीपद सोडण्यासाठी खडसेंवर आरोप सुरू असल्याचं खडसेंच्या निकटवर्तीयांनी म्हटलं आहे. 

खडसे समर्थक नगरसेवकांनी आज बैठक घेतली यात राजीनाम्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.यावेळी त्यांनी दमानिया यांचा निषेध देखील केला.

शहरातील टॉवर चौकात पुतळा दहन

भाजप युवा मोर्चाच्या जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थकांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि प्रिती मेनन यांच्या पुतळ्याचे दहन केलंय.  

खडसे यांच्यावर खोटे आरोप होत आहेत,  असे खोटे आरोप करणा-यांचा निषेध करीत असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलय.  जळगाव शहरातील टॉवर चौकात हे पुतळा दहन करण्यात आलं.