नोकरी : व्हा महाराष्ट्र पोलीस दलात सहभागी!

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच तुम्हाला महाराष्ट्राला पोलीस दलात सहभागी व्हायची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2015-16 साठी तारखा जाहीर करण्यात आल्यात. यावेळी, तब्बल 9516 जागांसाठी भरती होणार आहे.  

Updated: Dec 4, 2014, 04:26 PM IST
नोकरी : व्हा महाराष्ट्र पोलीस दलात सहभागी! title=

मुंबई : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच तुम्हाला महाराष्ट्राला पोलीस दलात सहभागी व्हायची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2015-16 साठी तारखा जाहीर करण्यात आल्यात. यावेळी, तब्बल 9516 जागांसाठी भरती होणार आहे.  

महत्त्वाच्या तारखा :
* 2015-16 साठीच्या पोलीस भरतीसाठी पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म - 10 जानेवारी 2015 रोजी उपलब्ध होतील.
* हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे - 5 फेब्रुवारी 2015
* बँकेत चलान भरण्याची शेवटची तारीख आहे - 6 फेब्रुवारी 2015 
*ट्रान्झॅक्शन आयडी भरण्याची शेवटची तारीख आहे - 10 फेब्रुवारी 2015

9615 जागेचे जिल्हावारी विवरण खालीलप्रमाणे :-
मुंबई - 3200
पुणे - 1400
रायगड - 1350
सातारा - 430
सांगली - 250
ठाणे - 470
ठाणे ग्रामीण - 220
नवी मुंबई - 450
गडचिरोली - 700
नागपूर - 350
रत्नागिरी - 315
हिंगोली - 150
बीड - 180

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.