इन्सुरेन्सच्या पैशासाठी बिल्डरचा मृत्यूचा बनाव

अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करुन इन्शुरन्सचे पैसे हडप करण्याच्या प्रयत्नात असणा-या बिल्डर अमोल पवारचा कोल्हापूर पोलीस कसून तपास करतायत.

Updated: Mar 18, 2016, 10:42 PM IST
इन्सुरेन्सच्या पैशासाठी बिल्डरचा मृत्यूचा बनाव title=

कोल्हापूर : अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करुन इन्शुरन्सचे पैसे हडप करण्याच्या प्रयत्नात असणा-या बिल्डर अमोल पवारचा कोल्हापूर पोलीस कसून तपास करतायत.

अमोल पवार या बिल्डरने कोल्हापूर महापालिकेच्या काही नगरसेवकांकडून उसने घेतल्याचं तपासात समोर आलंय. या नगरसेवकांनी पैसे वसूल करण्यासाठी बिल्डर अमोल पवार याला त्रास दिल्याचीही माहिती मिळतेय.

बिल्डर अमोल पवारने बॅका, खाजगी सावकार आणि नगरसेवकांकडून पैसे घेतले होते. या सगळ्यांनी अमोलकडं पैसै वसुलीसाठी तगादा लावला होता.. त्यातुन सुटका करुन घेण्यासाठी अमोल पवार यांने आपल्या मृत्यूचा बनाव केल्याचं उघड झालं होतं.

पोलिसांनी या प्रकरणात ज्या ज्या व्यक्तींचा संबध येईल त्याचा सगळ्याचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं बिल्डर अमोल पवार यांच्या संबधित असणा-या नगरसेवकांच्या पोटात चांगलाच गोळा आलाय.