कोकण रेल्वेचा प्रवासी पंधरवडा, स्थानके होणार चकाचक

कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवासी सुविधा पंधरवड्यानिमित्ताने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यासाठी प्रवाशांशी चर्चा व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी केली. तसेच झीरो वेस्ट स्टेशन संकल्पनेतून कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्टेशन स्वच्छ केली जाणार आहेत. रेल्वेने रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्यसाधून हा पंधरवडा साजरा करण्याचे ठरविले आहे.

Updated: Jun 4, 2015, 02:06 PM IST
कोकण रेल्वेचा प्रवासी पंधरवडा, स्थानके होणार चकाचक title=

मुंबई : कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवासी सुविधा पंधरवड्यानिमित्ताने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यासाठी प्रवाशांशी चर्चा व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी केली. तसेच झीरो वेस्ट स्टेशन संकल्पनेतून कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्टेशन स्वच्छ केली जाणार आहेत. रेल्वेने रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्यसाधून हा पंधरवडा साजरा करण्याचे ठरविले आहे.

प्रवाशांच्या समस्या जाणून घेतानाच स्थानकांमध्ये बायोटॉयलेट, पेंट्रीकारमधून रेल्वेरुळ आणि परिसरात होणारा कचरा उचलला  जाणार आहे. यानिमित्ताने तायल यांनी प्रवाशांच्या काय समस्या आहेत याबाबत माहिती घेतली. 

स्वच्छता अभियान राबविताना ज्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी जैव शौचालय उभारण्यात येणार आहे. याची सुरुवात मडगाव स्टेशनातून केली जाणार आहे. तसेच कंपोस्ट प्लॅण्ट तयार केला जाणार आहे.

रेल्वे प्रवाशांना रेल्वे रुळ क्रॉसिंग करताना काय घ्यावी काळजी, याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाहनधारकांना मार्गदर्शन केले. कोकण रेल्वे आयोजित सुरक्षितता जागृती भाग म्हणून रेल्वे फाटकांवर पत्रके  वाटप करण्यात आले.  

पावसाळ्यात सुरक्षितेची काय काळजी घ्यावी याबाबत   रत्नागिरी येथे कर्मचारी पूर्व-पावसाळा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तसेच अधिकारी स्टेशनवर स्वच्छता आणि इतर तरतुदी तपासण्यासाठी केंद्रांची पाहणी करत आहेत.

काय आहेत योजना

> कचरा करणाऱ्या व्यावसायिकांना ५० हजार रुपयांचा दंड

शाळा, महाविद्यालय विद्यार्थी तसेच सामाजिक संघटनांद्वारे स्वच्छता अभियानासाठी मदत

टॅक्सी, रिक्षाचालकांचीही मदत

दहावी, बारावीसाठी करिअर प्रशिक्षण

गरीब, गरजूंसाठी आरोग्य शिबीर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.