लातुरात मुस्लिम समाजाच्यावतीने भव्य मूकमोर्चा

मराठा, दलित-ओबीसी मोर्चानंतर आज लातूर शहरात मुस्लिम समाजाच्यावतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. 

Updated: Nov 30, 2016, 09:16 PM IST
 लातुरात मुस्लिम समाजाच्यावतीने भव्य मूकमोर्चा title=

लातूर : मराठा, दलित-ओबीसी मोर्चानंतर आज लातूर शहरात मुस्लिम समाजाच्यावतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम समाजाला सरशकत आरक्षणाची प्रमुख मागणीसाठी हा मूक मोर्चा काढण्यात आला. 

शहरातल्या गंजगोलाईतून निघालेला हा मोर्चा गांधी चौक, अशोक हॉटेल, शिवजीचौक मार्गे ईदगाह मैदानापर्यंत निघाला. 

मुस्लिम समाजाला शिक्षण-नोकरीत आरक्षण द्यावं, सच्चर समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, मुस्लिम पर्सनल लॉ मध्ये शासनानं हस्तक्षेप करू नये, गोवंश हत्याबंदीचा वापर समाजावर अत्याचारासाठी केला जातोय, त्यावर नियंत्रण आणावे या प्रमुख मागण्या यावेळी मोर्चेकरांनी केल्या. 

आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय.