पाहा जलसंपदा मंत्र्यांचं लेझिम

मतदारसंघात भाऊ अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे आमदार तसच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उत्कृष्ठ प्रकारे ढोल ताशांच्या तालावर नृत्य करू शकतात, याच्यावर कदाचित कुणाचाही विश्वास बसणार नाही

Updated: Apr 16, 2015, 06:22 PM IST
पाहा जलसंपदा मंत्र्यांचं लेझिम title=

जळगाव : मतदारसंघात भाऊ अशी ओळख असलेले जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे आमदार तसच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे उत्कृष्ठ प्रकारे ढोल ताशांच्या तालावर नृत्य करू शकतात, याच्यावर कदाचित कुणाचाही विश्वास बसणार नाही

मात्र, जामनेरमधील गणपती विसर्जन मिरवणूक असो किवा एखाद्या गावातील विवाह सोहळा कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर, त्यांना वाद्याच्या तालावर ठेका धरावा लागतो, हा महाजन यांच्याविषयीचा गेल्या कित्येक वर्षातला अनुभव आहे.

नुकत्याच झालेल्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जामनेरमध्ये आयोजित केलेल्या शोभायात्रेत  जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी ढोलताशाच्या तालावर तरुणाईला लाजवेल, असे लेझीम नृत्य केले.

पाहा जलसंपदा मंत्र्यांची लेझिम

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.