तळीरामांवर सर्जिकल स्ट्राईक, महिन्याला फक्त दोनच बाटल्या

परवानाधारक मद्यपींना राज्यसरकारनं दणका दिला आहे. आता मद्यपींना महिन्याला केवळ दोनच बाटल्या बाळगता येणार आहेत.

Updated: Nov 19, 2016, 06:24 PM IST
तळीरामांवर सर्जिकल स्ट्राईक, महिन्याला फक्त दोनच बाटल्या title=

राळेगणसिद्धी : परवानाधारक मद्यपींना राज्यसरकारनं दणका दिला आहे. आता मद्यपींना महिन्याला केवळ दोनच बाटल्या बाळगता येणार आहेत. काही दिवसांपूर्वी 16 बाटल्या बाळगण्याची परवानगी देणारा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती राज्यच्या उत्पादन शुल्क आयुक्त व्ही. राधा यांनी राळेगणसिद्धी इथं बोलताना दिली. या निर्णयाची तातडीनं म्हणजेच शुक्रवारपासूनच अंमलबजावणी करण्यात आली आहे.

येत्या हिवाळी अधिवेशनात ग्रामरक्षक दल आणि अवैध धंदे रोखण्याचं विधेयक मांडण्यात येणार आहे. या विधेयकाच्या मसुद्याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी राधा राळेगणसिद्धीमध्ये आले होते. अण्णा हजारेंनी या मसुद्यामध्ये काही दुरुस्त्या सुचवल्या आहेत. या दुरुस्त्यांनंतर हे विधेयक अधिवेशनात मांडण्यात येईल.