प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दारू विकण्यावर बंदी

राज्यात प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये यापुढे मद्य मिळणार नाही, असं महाराष्ट्र सरकारनं मुंबई हायकोर्टाला सांगितलंय. एक एप्रिलपासून मद्य प्लास्टिकच्या बाटलीमध्ये विकण्यावर बंदी लागू होणार आहे. 

Updated: Feb 2, 2016, 10:27 PM IST
प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दारू विकण्यावर बंदी title=

मुंबई : राज्यात प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये यापुढे मद्य मिळणार नाही, असं महाराष्ट्र सरकारनं मुंबई हायकोर्टाला सांगितलंय. एक एप्रिलपासून मद्य प्लास्टिकच्या बाटलीमध्ये विकण्यावर बंदी लागू होणार आहे. 

वापरकर्त्यांच्या स्वास्थ्यासाठी हे हानिकारक असल्याचं कारण महाराष्ट्र सरकारनं दिलंय. पॉलिथीन टेरिफ्थेलॅट बाटल्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये दारुच्या विक्रीवर बंदी आणण्यात यावी, अशा आशयाची एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर राज्य सरकारनं प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी आणण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलंय.   

उल्लेखनीय म्हणजे, प्लास्टिकच्या बाटल्यांवर एक्सापायरी डेटही नसते तसंच अशा बाटल्यांमध्ये ठेवलेली दारू कँसरला आमंत्रण देऊ शकते, असंही या याचिकेत म्हटलं गेलं होतं.