महाड दुर्घटना : एसटीच्या शोधासाठी ३०० किलोचं चुंबक

 महाडजवळ सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर झालेल्या अपघातात दोन एसटी बस बेपत्ता झाल्या. या अपघातात अनेक जण बेपत्ता आहे.  घटनेनंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 

Updated: Aug 3, 2016, 05:40 PM IST
महाड दुर्घटना : एसटीच्या शोधासाठी ३०० किलोचं चुंबक  title=

महाड :  महाडजवळ सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर झालेल्या अपघातात दोन एसटी बस बेपत्ता झाल्या. या अपघातात अनेक जण बेपत्ता आहे.  घटनेनंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 

त्यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, एनडीआरएफने एसटी किंवा इतर गाड्यांच्या शोधासाठी ३०० किलोचं चुंबक आणलं आहे. 

ते चुंबक हेलिकॉप्टरच्या साहाय्याने ते चुंबक उफाळलेल्या सावित्री नदीत सोडण्यात येत आहेत. त्यांच्या साहय्याने गाड्यांचा तपास घेतला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.