रणसंग्राम : नवी मुंबईत त्रिशंकू स्थिती

नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांसाठी काल मतदान झालं आज निकाल जाहीर होतोय 

Updated: Apr 23, 2015, 06:06 PM IST
रणसंग्राम : नवी मुंबईत त्रिशंकू स्थिती title=

नवी मुंबई : चुरशीच्या ठरलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीनं सरशी घेतलीय. तर शिवसेनेनं राष्ट्रवादीला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केलाय. पण, लोकसभेत मोदी लाटेत वरचढ ठरलेल्या भाजपला आणि काँग्रेसला मात्र राष्ट्रवादी आणि सेनेच्या जागांच्या जवळही जाता आलेलं नाही. 

अंतिम निकाल... - १११ निकाल घोषित

  • राष्ट्रवादी - ५३

  • शिवसेना - ३७

  • काँग्रेस - १०

  • भाजप - ६

  • अपक्ष - ५

 

अपक्ष विजयी उमेदवार ठरणार राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाचे...
सुधाकर सोनावणे( राष्ट्रवादी समर्थक)
रजना सोनावणे- (राष्ट्रवादी समर्थक)
सीमा गायकवाड़( शीवसेना बंडखोर)
सायली शिदे ( राष्ट्रवादी बंडखोर)
श्रद्धा गवस ( शीवसेना बंडखोर) 

 

दुपारी २.४५ वाजता

- प्रभाग क्रमांक ८७ मधून शिवसेनेच्या सुनिता मांडवे विजयी
- प्रभाग क्रमांक ९८ मधून राष्ट्रवादीच्या स्वप्ना गावडे विजयी 

उल्लेखनीय : एकाच घरातल्या तीन महिला विजयी

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरत भगत यांची पत्नी वैजयंती भगत, वहिनी फशीबाई भगत आणि सून रुपाली भगत या तिघींनीही मिळवला विजय

दुपारी २.३० वाजता
- प्रभाग क्रमांक १११ मधून राष्ट्रवादीचे गणेश म्हात्रे विजयी  
- प्रभाग क्रमांक ११० मधून राष्ट्रवादीचे विनोद म्हात्रे विजयी  
- प्रभाग क्रमांक ९७ मधून शिवसेनेचे काशिनाथ पवार विजयी  

दुपारी २.१० वाजता
- प्रभाग क्रमांक ८६ मधून राष्ट्रवादीच्या जयश्री ठाकूर विजयी
-  प्रभाग क्रमांक ९७ मधून शिवसेनेचे काशिनाथ पवार विजयी  

उल्लेखनीय 
नवी मुंबईचे मावळते उपमहापौर आणि राष्ट्रवादीचे नेते अशोक गावडे प्रभाग क्रमांक १०९ मधून विजयी... 
अवघ्या तीन मतांनी विजय पडलाय पदरात... हा अशोक गावडे यांचा अनोखा विक्रमच म्हणावा लागेल.

दुपारी १.४५ वाजता
- प्रभाग क्रमांक ८५ मधून राष्ट्रवादीच्या सुजाता पाटील विजयी
- प्रभाग क्रमांक ३३ मधून भाजपच्या उषा पाटील विजयी
 - प्रभाग क्रमांक ७८ मधून काँग्रेसच्या रूपाली भगत विजयी

दुपारी १.४० वाजता
- प्रभाग क्रमांक ३२ मधून शिवसेनेचे प्रशांत पाटील विजयी 
- प्रभाग क्रमांक २३ मधून शिवसेनेचे ममित चौगुले विजयी  
- प्रभाग क्रमांक ७६ मधून राष्ट्रवादीच्या संगिता बोऱ्हाडे विजयी  
- प्रभाग क्रमांक ४३ मधून शिवसेनेच्या दमयंती आचरे विजयी  
- प्रभाग क्रमांक ९६ मधून राष्ट्रवादीच्या रुपाली भगत विजयी  
- प्रभाग क्रमांक १०८ मधून राष्ट्रवादीचे विशाल डोळस विजयी    

उल्लेखनीय : नवी मुंबईत सात दाम्पत्याचा विजय
- राष्ट्रवादीचे उमेदवार राधा कुलकर्णी आणि त्यांचे पती सुरेश कुलकर्णी विजयी
- शिवसेनेच्या उमेदवार अनिता पाटील आणि त्यांचे पती शिवराम पाटील विजयी
- अपक्ष उमेदवार रंजना सोनावणे आणि त्यांचे सुधाकर सोनावणे विजयी
- शिवसेनेचे उमेदवार मनोहर मढवी आणि पत्नी विनया मढवी यांचा विजय  
- शिवसेनेच्या उमेदवार कोमल वास्कर आणि  सोमनाथ वास्कर हे नवरा बायको विजयी झालेत.
- राष्ट्रवादीचे उमेदवार नवीन गवते आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गवते
- शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी गवते आणि त्यांचे पती जगदीश गवते

दुपारी १.१५ वाजता
- प्रभाग क्रमांक २२मधून शिवसेनेचे चेतन नाईक विजयी 
- प्रभाग क्रमांक ७५ मधून शिवसेनेच्या कोमल वास्कर विजयी 

दुपारी १.०० वाजता
- प्रभाग क्रमांक १०६ मधून काँग्रेसच्या पूनम पाटील विजयी 
- प्रभाग क्रमांक ३० मधून शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर विजयी 
- प्रभाग क्रमांक ९५ मधून राष्ट्रवादीचे गिरीश म्हात्रे विजयी 
- प्रभाग क्रमांक २१ मधून शिवसेनेचे करण मनोहर मढवी विजयी 
 - प्रभाग क्रमांक ४१ मधून राष्ट्रवादीच्या छाया म्हात्रे विजयी 

दुपारी १२.४५ वाजता

- प्रभाग क्रमांक ९ मधून राष्ट्रवादीचे नविन गवते विजयी 
- प्रभाग क्रमांक ९४ मधून अपक्ष उमेदवार श्रद्धा गवस विजयी 
- प्रभाग क्रमांक ५५ मधून राष्ट्रवादीचे मुनावर पटेल विजयी 
- प्रभाग क्रमांक ४० मधून शिवसेनेचे शिवराम पाटील विजयी 
- प्रभाग क्रमांक २९ मधून राष्ट्रवादीचे निवृत्ती जगताप विजयी 
- प्रभाग क्रमांक १०५ मधून शिवसेनेच्या भारती कोळी विजयी 
 
उल्लेखनीय : आई, वडील आणि मुलगाही विजयी
नवी मुंबईत एकाच घरातील तीन जणांनी निवडून येण्याचा पराक्रम केलाय. 
विनया मढवी व मनोहर मढवी हे नवरा बायको तर निवडून आलेच पण त्यांचा मुलगा करण मढवीही विजयी झालेत. 

दुपारी १२.३० वाजता
- प्रभाग क्रमांक ७१ मधून राष्ट्रवादीच्या पूजा मेढकर विजयी 
- प्रभाग क्रमांक ७२ मधून राष्ट्रवादीच्या शशिकला पाटील विजयी
- प्रभाग क्रमांक ७३ मधून राष्ट्रवादीच्या राधा सुरेश कुलकर्णी विजयी  
- प्रभाग क्रमांक २७ मधून राष्ट्रवादीचे लक्ष्मीकांत पाटील विजयी 
- प्रभाग क्रमांक ३८ मधून शिवसेनेच्या मेघाली राऊत विजयी 
- प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेनेच्या विनया मढवी विजयी 
- प्रभाग क्रमांक ८ मधून शिवसेनेचे बहादूर सिंग विजयी 
- प्रभाग क्रमांक ६२ मधून काँग्रेसच्या अंजली वाळूंज विजयी 
- प्रभाग क्रमांक ८२ मधून शिवसेनेचे विशाल ससाणे विजयी 
- प्रभाग क्रमांक २८ मधून राष्ट्रवादीच्या मोनिका पाटील विजयी 
- प्रभाग क्रमांक ५२ मधून शिवसेनेच्या निर्मला कचरे  विजयी 
- प्रभाग क्रमांक १७ मधून काँग्रेसच्या हेमांगी सोनावणे विजयी 

 दुपारी १२.१५ वाजता

- प्रभाग क्रमांक २७ मधून राष्ट्रवादीचे लक्ष्मीकांत पाटील विजयी
- प्रभाग क्रमांक ६१ मधून शिवसेनेचे किशोर पाटकर पाटील विजयी
- प्रभाग क्रमांक १५ मधून राष्ट्रवादीच्या संगिता पाटील विजयी
- प्रभाग क्रमांक १५ मधून राष्ट्रवादीच्या संगिता पाटील विजयी
- प्रभाग क्रमांक ९३ मधून शिवसेनेचे नामदेव भगत विजयी 
- प्रभाग क्रमांक ५० मधून राष्ट्रवादीचे लिलाधर नाईक विजयी 
- प्रभाग क्रमांक ७ मधून शिवसेनेचे विजय चौगुले विजयी   

उल्लेखनीय 
नवी मुंबई : प्रभाग क्रमांक ५१ मध्ये  नणंद-भावजय लढतीत राष्ट्रवादीच्या वैशाली नाईक यांचा विजय... भाजपच्या वैष्णवी वैभव नाईक यांचा ७१ मतांनी पराभव

दुपारी १२.०० वाजता
- प्रभाग क्रमांक ८१ मधून राष्ट्रवादीचे जयवंत सुतार विजयी
- प्रभाग क्रमांक ६ मधून राष्ट्रवादीच्या संगिता यादव विजयी
- प्रभाग क्रमांक ४९ मधून शिवसेनेचे रामदास पवळे विजयी
- प्रभाग क्रमांक ३७ मधून अपक्ष उमेदवार सायली शिंदे विजयी
- प्रभाग क्रमांक १०३ मधून राष्ट्रवादीच्या सुरेखा नरबागे विजयी

सकाळी ११.५० वाजता
- प्रभाग क्रमांक ५९ मधून शिवसेनेचे हरिश्चंद्र भोईर विजयी 
- प्रभाग क्रमांक १४ मधून शिवसेनेचे आकाश मढवी  विजयी 
 - प्रभाग क्रमांक ६३ मधून भाजपच्या दयावती शेवाळे विजयी  
- प्रभाग क्रमांक ५ मधून सेनेचे जगदीश गवते विजयी  

उल्लेखनीय...
- प्रभाग क्रमांक ६० मधून काँग्रेसचे अविनाश लाड विजयी... शिवसेना संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे पराभूत...
- बीग फाईट : काँग्रेसच्या अविनाश लाड यांनी शिवसेनेचे जेष्ठ उमेदवार विठ्ठल मोरे यांना पछाडलं...

सकाळी ११.४५ वाजता
- प्रभाग क्रमांक ३८ मधून शिवसेनेच्या सुवर्णा पाटील विजयी 
- प्रभाग क्रमांक १०२ मधून राष्ट्रवादीचे अशोक गुरखे विजयी 
- प्रभाग क्रमांक ९२ मधून भाजपचे सुनील पाटील विजयी
- प्रभाग क्रमांक ४८ मधून राष्ट्रवादीच्या मनिषा भोईर विजयी

सकाळी ११.४० वाजता
- नवी मुंबई प्रभाग क्रमांक ६८ स्थायी समिती सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश कुलकर्णी विजयी
- प्रभाग क्रमांक २४ मधून काँग्रेसच्या मंदाकिनी म्हात्रे विजयी 
- प्रभाग क्रमांक १३ मधून शिवसेनेच्या नंदा काटे विजयी 
- प्रभाग क्रमांक ५  मधून शिवसेनेचे जगदीश गवते विजयी  

सकाळी ११.३० वाजता

- प्रभाग क्रमांक ८० मधून राष्ट्रवादीच्या कविता आंगोडे विजयी 
- प्रभाग क्रमांक ४७ मधून राष्ट्रवादीच्या लता मढवी विजयी 
- प्रभाग क्रमांक ५८ मधून राष्ट्रवादीचे प्रकाश मोरे विजयी 

सकाळी ११.१५ वाजता
- प्रभाग क्रमांक १२ मधून शिवसेनेचे संजू वाडे विजयी
- प्रभाग क्रमांक ५४ मधून  राष्ट्रवादीचे शशिकांत राऊत विजयी
- प्रभाग क्रमांक ५६ मधून राष्ट्रवादीच्या उषा भोईर विजयी
- प्रभाग क्रमांक ६५ मधून काँग्रेसच्या फशीबाई भगत विजयी
- प्रभाग क्रमांक ३५ मधून शिवसेनेच्या दीपाली सकपाळ विजयी

उल्लेखनीय...
नवी मुंबईत रंजना सोनावणे आणि सुधाकर सोनावणे हे नवरा - बायको अपक्ष म्हणून दोघेही विजयी 

सकाळी ११.०० वाजता

- प्रभाग क्रमांक ५३ मधून राष्ट्रवादीच्या प्रज्ञा भोईर विजयी
- प्रभाग क्रमांक  २० मधून अपक्ष रंजना सोनावणे विजयी
- प्रभाग क्रमांक ९१ मधून राष्ट्रवादीच्या नेत्रा शिर्के विजयी
- प्रभाग क्रमांक ६७ मधून राष्ट्रवादीच्या शुभांगी मोरे विजयी
- प्रभाग क्रमांक ४६ मधून राष्ट्रवादीचे शंकर मोरे विजयी

सकाळी १०.५० वाजता
- प्रभाग क्रमांक  २ मधून शिवसेनेच्या शुभांगी गवस विजयी
- प्रभाग क्रमांक ७९ मधून शिवसेनेच्या हृचा पाटील विजयी
- प्रभाग क्रमांक ३४ मधून शिवसेनेच्या कमल पाटील विजयी

सकाळी १०.४५ वाजता
- प्रभाग क्रमांक ७७ मधून काँग्रेसच्या वैजयंती भगत विजयी... मिळालेली मते १५९१
- प्रभाग क्रमांक ४५ मधून  राष्ट्रवादीच्या संगीता म्हात्रे  विजयी
- प्रभाग क्रमांक १०१ मधून शिवसेनेच्या सरोज पाटील विजयी
- प्रभाग क्रमांक ६६ मधून भाजपचे रामचंद्र घरात विजयी
- प्रभाग क्रमांक ११ मधून शिवसेनेचे राजू कांबळे  विजयी

सकाळी १०.४० वाजता
- प्रभाग क्रमांक ९० मधून काँग्रेसच्या मीरा संजय पाटील विजयी
- प्रभाग क्रमांक ४४ मधून राष्ट्रवादीच्या भारती पाटील विजयी 

सकाळी १०.३५ वाजता
- प्रभाग क्रमांक १ मधून भाजपाच्या हेमलता झंजाड विजयी
- प्रभाग क्रमांक २६ (महापे)मधून राष्ट्रवादीचे  रमेश डोळे विजयी

सकाळी १०.३२
शिवसेनेचे विठ्ठल मोरे पिछाडीवर... मोरे सेनेचे संपर्कप्रमुख

सकाळी १०.३० वाजता
- वॉर्ड क्रमांक १९ मधून अपक्ष उमेदवार सुधाकर सोनावणे विजयी
- वॉर्ड क्रमांक १० (ऐरोली) मधून राष्ट्रवादी उमेदवार शशिकला सुतार विजयी

सकाळी १०.३० वाजता
नवी मुंबईतला पहिला निकाल हाती... प्रभाग क्रमांक ५७ मधून विलास भोईर यांचा विजय 

सकाळी १०.२५ वाजता 
आघाडीवर - राष्टवादी सहा, सेना तीन, भाजप एक, काँग्रेस तीन, अपक्ष एक जागेवर आघाडी
प्रभाग दहा मधून राष्टृवादाच्या शशिकला सुतार १०७ मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक ६५ मधून काँग्रेसच्या फशीबाई भगत १०० मतांनी आघाडीवर
प्रभाग क्रमांक ५८ व ६४ मधून राष्ट्रवादी आघाडीवर
प्रभाग क्रमांक ६३ मध्ये भाजप आघाडीवर 

सकाळी १०.१५ वाजता
प्रभाग क्रमांक ६४ मधून पोस्ट मतदानात राष्ट्रवादी आघाडीवर
राष्ट्रवादीला चार जागांवर आघाडी तर काँग्रेस, शिवसेना आणि बीजेपीला एका जागेवर आघाडी 

सकाळी १०.०० वाजता 
- नवी मुंबईत चार केंद्रांवर मतमोजमीला सुरुवात

 

नवी  मुंबई : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकांसाठी काल मतदान झालं तर मतमोजणी सुरू झालीय. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झालीय. उमेदवार, पक्षांबरोबरच, नागरिकांचं भविष्यही या निकालातून दिसणार आहे.  

नवी मुंबई महापालिकेच्या १११ जागांसाठी काही तुरळक घटना वगळता शांततेत मतदान पार पडलं. नवी मुंबईत सरासरी ४८.३५ टक्के मतदान झालं. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा तब्बल आठ टक्क्यांनी जास्त मतदान झालं. त्यामुळं या वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

बोगस वोटिंग उघड... 
मतदानादरम्यान बोगस व्होटिंग आणि तुरळक हाणामरीचे प्रकार झाले. राष्ट्रवादीनं बोगस मतदारांच्या साहय्यानं मतदान केल्याचा आरोप शिवसेनेनं केला. विशेष म्हणजे बोगस व्होटर्सनं त्याचीही कबुलीही दिली. तर गोठीवलीत पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला. 

७० बोगस मतदार पोलिसांच्या ताब्यात... 
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा शिवसेनेनं आरोप केलाय. नेरुलच्या कुकशेत गावात प्रभाग क्रमांक ८५ इथे ७० जणांनी बोगस व्होटिंग केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. शिवसैनिकांनी यातल्या काही जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच असे प्रकार सुरू केल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केलाय... गमतीचा भाग म्हणजे आपल्याला एका काँट्रॅक्टरनं घड्याळाला मत देण्यासाठी आणल्याची कबुलीच यातल्या एकानं झी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर दिलीयं.

तणावाचं वातावरण 
नवी मुंबईच्या वॉर्ड क्रमांक १५ मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. महानगर पालिका निवडणुकीत १० महिलांनी बोगस मतदान केल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना पांगवल्याने वातावरण शांत झाले. 

प्रश्न नाईकांच्या सत्तेचा आणि प्रतिष्ठेचा... 
गेल्या २० वर्षांपासून गणेश नाईकांची एकाहाती सत्ता नवी मुंबईच्या महापालिकेवर आहे. त्यामुळं नाईक आपला बालेकिल्ला राखणार का हा प्रश्न अनेकांना सतावतोय.  
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.