धक्कादायक : गाडीत हातपाय बांधून जिवंत जाळलं

जिल्ह्यातल्या साक्री शहरात थरकाप उडवणारी खुनाची घटना घडली आहे. पाटबंधारे विभागाचे शिपाई गोकुळ रतन माळी यांना त्यांच्याच कार्यालयासमोर सॅन्ट्रो गाडीमध्ये हातपाय बांधून गाडीसह जिवंत जाळलं. यात गाडीसह गोकुळ माळी अक्षरशः जळून भस्समात झाले.

Updated: Jan 29, 2017, 10:15 AM IST
धक्कादायक : गाडीत हातपाय बांधून जिवंत जाळलं title=

धुळे : जिल्ह्यातल्या साक्री शहरात थरकाप उडवणारी खुनाची घटना घडली आहे. पाटबंधारे विभागाचे शिपाई गोकुळ रतन माळी यांना त्यांच्याच कार्यालयासमोर सॅन्ट्रो गाडीमध्ये हातपाय बांधून गाडीसह जिवंत जाळलं. यात गाडीसह गोकुळ माळी अक्षरशः जळून भस्समात झाले.

गंभीर बाब म्हणजे संपत्तीतला वाद आणि भाऊबंदकीतून ही निर्घृण हत्या केली गेल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी गोकुळ माळी यांचे चुलत भाऊ आणि पुतणे अशा पाच जणांविरोधात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संपूर्ण साक्री शहर या हत्येमुळे हादरलंय. गोकुळ माळी यांना त्यांच्या मुलासमोर जिवंत जाळण्यात आलं.