कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग

कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय. वरिष्ठांकडून चार ज्युनिअरविद्यार्थांना जबर मारहाण करण्यात आली. 

Updated: Dec 5, 2015, 04:42 PM IST
कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग  title=

कोल्हापूर : कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय. वरिष्ठांकडून चार ज्युनिअरविद्यार्थांना जबर मारहाण करण्यात आली. 

या मारहाणीत रमेश तांडे हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापुरातील CRP हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे याप्रकरण अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

परराज्यातील सहा सिनिअर विद्यार्थ्यांनी रॅगींगमधूनच ज्युनिअर्संना मारहाण केली असल्याची लेखी तक्रार विद्यार्थ्यांनी वरिष्ठांकडे केली. या प्रकरणाची चौकशी दोन वेगवेगळ्या समितीतर्फे सुरू आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबधित तातडीने कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिले. दरम्यान, या प्रकाराची नोंद करण्याचे काम राजारामपुरी पोलीस ठाण्यात सुरू होते. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वसतीगृह शेडापार्क येथे आहे. याठिकाणी कॅन्टीनचीही सोय आहे. वस्तीगृहात जयंत तोंडे हा एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. आज सकाळी आठच्या सुमारास जयंत तोंडे हा वसतीगृहाच्या कॅन्टीनमध्ये नाष्टा करण्यासाठी गेला. त्यावेळी काल रॅगींग व दमदाटी करणारे सहा सिनीअर विद्यार्थी कॅन्टीनमध्ये आले. त्यांनी जयंतबरोबर भांडण काढण्यास सुरवात केली. त्याला धक्काबुकीही केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.