एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी 'मेगाब्लॉक'

शुक्रवार पासून सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत ब्लॉक घेवून धोकादायक दरडीतील दगड काढले जाणार आहेत. यासाठी मार्ग पूर्णवेळ बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. 

Updated: Jul 23, 2015, 08:29 PM IST
एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी  'मेगाब्लॉक' title=

लोणावळा : शुक्रवार पासून सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत ब्लॉक घेवून धोकादायक दरडीतील दगड काढले जाणार आहेत. यासाठी मार्ग पूर्णवेळ बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. 

आज (गुरूवार) दरडी काढण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणाची जमवा जमव केली जात होती. पुणे येथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील एक लेन बुधवारपासूनच बंद करण्यात आली आहे. दरडी काढण्याचे काम सुरू असताना अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून वळविण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्या हलक्या वाहनांच्या चालकांनी जुन्या मार्गाचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

वाहतूक व्यवस्थेत झालेला बदल......... 
1.  धोकादायक दरडी हटविण्याचे काम सुरू असताना मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक एक्सप्रेसवेवरून खोपोली ते खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते मॅजिक पॉईंट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 एचओसी ब्रीज अशी वळविण्यात आली आहे.
2.  पुण्याहुन मुंबईकडे जाणारी वाहने द्रुतगती मार्गावरील अंडा पॉईंट ते मॅजिक पॉईंट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते खालापूर टोलनाका द्रुतगती मार्ग अशी वळविण्यात ओली आहे.
3.  दुपारी 12 ते 4 या दरम्यान जड वाहनांची वाहतूक दुरूस्ती कामांच्या आवश्यकतेनुसार टप्या टप्याने मंद गतीने चालू अथवा बंद करून द्रुतगती मार्गावरून सुरू ठेवण्यात येईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.