'प्रणिती माफी मागा' ; एमआयएम आक्रमक

"प्रणिती शिंदे यांनी आठ दिवसांत जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं," अशी कायदेशीर नोटीस एमआयएमच्या वकिलांनी पाठवली आहे.

Updated: Nov 9, 2014, 12:54 PM IST
'प्रणिती माफी मागा' ; एमआयएम आक्रमक title=

सोलापूर : "प्रणिती शिंदे यांनी आठ दिवसांत जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं," अशी कायदेशीर नोटीस एमआयएमच्या वकिलांनी पाठवली आहे.

सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात एमआयएमने आक्रमक पावित्रा घेतला आहे. प्रणिती शिंदे यांना एमआयएमसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची चिन्हं दिसून येत आहे.
 
“देशद्रोही, दहशतवादी आणि एमआयएम यांच्यात फरक नाही, त्यामुळे त्यांच्यावर बंदी घाला” अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली होती. प्रणिती शिंदे यांचं हे वक्त वादग्रस्त ठरलं, या वादग्रस्त वक्तव्याची माफी मागावी, अशी मागणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसे यांनीही केलीय.
 
एवढंच नाही तर आता एमआयएमच्या वकिलांनी प्रणिती शिंदेंना नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे एमआयएमला नेमकं काय उत्तर देणार याकडे सर्वांची नजर लागून आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.