अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. या घटनमुळे पुन्हा एकदा नगर हादरले आहे. याप्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

Updated: Feb 11, 2017, 04:40 PM IST
अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार title=

अहमदनगर : जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. या घटनमुळे पुन्हा एकदा नगर हादरले आहे. याप्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

नेवासा तालुक्यातील रास्तापुर गावात राहणाऱ्या सोमा वैरागर याने आपल्याच गावातील ९ वीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार केल्याचे पुढे आलेय. पिडीत मुलीला गुंगीचे औषध पाजून शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. 

घटना उघडकीस आल्यावर पिडीत मुलीला उपचारासाठी तातडीने नेवासा तालुक्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात सोमा वैरागर याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने संशयित आरोपीला अटक केली आहे.