धक्कादायक ! आई मुलीकडून करुन घ्यायची देहव्यापार

गिट्टीखदान येथे चालणाऱ्या देह व्यापाराच्या ठिकाणावर पोलिसांनी धाड ठाकली आणि एका युवतीला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी येथून एक महिला दलालला देखील अटक केली तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

Updated: Apr 24, 2016, 06:01 PM IST
धक्कादायक ! आई मुलीकडून करुन घ्यायची देहव्यापार title=

नागपूर : गिट्टीखदान येथे चालणाऱ्या देह व्यापाराच्या ठिकाणावर पोलिसांनी धाड ठाकली आणि एका युवतीला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी येथून एक महिला दलालला देखील अटक केली तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

देह व्यापार करणारी तरुणी आणि दलाली करणारी महिला यांच्यात एक नातं असल्याचं समोर आलं आणि ते नातं होतं आई आणि मुलीचं. ही आईच तिच्या मुलीकडून देह व्यापार करुन घेत असल्याची घटना समोर आली आहे. घरातच हा व्यापार चालत असल्याचं पोलिसांनी माहिती मिळाली होती.

काही दिवसांपूर्वीच या महिलेला राजस्थानमध्ये देखील मुलीने देह व्यापार करण्यासाठी सांगणाऱ्या या आईबाबत पोलिसात तक्रार केली होती त्यानंतर ही महिला मुलीला घेऊन नागपूरमध्ये आली आणि घरातच तिने हा व्यापार सुरु केला. घरातचं या महिलेने एक गुप्त खोली तयार केली होती.